file photo 
नांदेड

नांदेड : बनावट कागदपत्रांद्वारे फायनान्स कंपनीला १३ लाखाचा गंडा

प्रल्हाद हिवराळे

उमरी (जिल्हा नांदेड)  : उमरी शहरातील महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे बनावट नमूना क्रमांक आठ सादर करुन बनावट सही व शिक्का वापरुन कंपनीची १३ लाख १२ हजार ४८५ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात उमरी पोलिस ठाण्यात १९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उमरी येथील महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे कर्ज मिळविण्यासाठी जामगाव (ता. उमरी ) काही जणांनी अर्ज केला होता. या अर्जासोबत बनावट नमुना क्रमांक आठ जोडला होता. त्यावर सचिवांची स्वाक्षरी आणि खोटे शिक्के मारण्यात आले होते. दुय्यम निबंधक कार्यालयात गहाण खत तयार करून त्याद्वारे १९ जणांनी तब्बल १३ लाख १२ हजार ४८५ रुपये कर्ज घएतले. पंरुत नंतरच्या काळात फायनांसच्या तापसणीत दाखल केलेल सर्व कागदपत्र हे बनावट असल्याचे उघडकीस आले. सर्व कर्जदारांनी कंपनीची फसवणूक केली प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात कंपनीचे व्यवस्थआपक मिलिंद सेलूकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन बाबुराव सोनकांबळे, अनुसया बोईनवाड, नागोराव जाधव, मनोज सावंत, जनार्दन जिरेवार, ज्ञानेश्वर घाडेलवार,सावित्रीबाई जिरेवार, वनिता जिरेवार, राजश्री घाडेलवार नंदाबाई अक्कमवाड, प्रतिभा अनपवाड, ज्ञानेश्वर पारुबाई जाधव, ज्ञानेशअवर जिनेवाड, पुंडलिक मेकलवाड, द्रुपदाबाई सोनकांबळे, सागरबाई सोनकांबळे सर्व राहणार जामगाव तालुका उमरी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. शेवाळे करीत आहेत दरम्यान बनावट शिक्के वापरुन फसवणूक केल्याचा प्रकार यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT