file photo 
नांदेड

नांदेड : कोरोनाच्या सावटाखाली विद्यार्थ्यांची सत्वपरीक्षा! बारावीच्या सराव परीक्षा सोशल डिस्टंसिंगमध्ये

साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंबंधी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळेत आणि ऑफलाइन होणार असल्याची माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही आगामी परीक्षेसाठी कंबर कसलीय. वाई बाजार येथील कै. पार्वतीबाई विद्यालयात बारावीच्या सराव परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी भर उन्हात सोशल डिस्टंसिंगमध्ये परीक्षेप्रतीचा संवेदनशीलपणा दाखवून दिला.

दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालेलं असून त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २० दरम्यान होणार आहे. तर, बारावीची परीक्षा ता. २३ एप्रिल ते ता. २१ मे या कालावधीत होणार आहे. या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून दरवर्षी नियमित सराव परीक्षा घेतल्या जातात. परंतु राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सराव परीक्षेत शिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र परीक्षा द्यावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु वाई बाजार येथील कै. पार्वतीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापकांनी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व फैलाव होणार नाही व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या दोन्ही गोष्टीची परिपूर्ण खबरदारी घेऊन बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणात निसर्गरम्य वातावरणात सोशल डिस्टंसिंग मध्ये सुरक्षित अंतर ठेऊन सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांचा सराव परीक्षेतील उत्साह पाहता लॉकडाउन काळात शिक्षणाचा बट्ट्याबोळ न होता विद्यार्थी शिक्षणाप्रती किती संवेदशील आहेत याचे वास्तव चित्र पाहायला मिळत आहे.

राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची तिळमात्र शक्यताही नाही. विहित केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा पार पडतील म्हणून काय पार्वतीबाई विद्यालयातील प्रा. जी. बी. राठोड, प्रा. जी. यु. वट्टमवार व प्रा. एस. जी. मगरे हे सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठीची तयारी करुन घेत आहेत. 
- प्राचार्य व्ही.आर.राठोड, कै.पार्वतीबाई विद्यालय,वाई बाजार.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT