file photo 
नांदेड

नांदेड : ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 नोव्हेंबरपासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी घोषित केले आहे.

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

आरोग्य क्षेत्रातील रोजगार व कौशल्य विकासावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे शुक्रवारी आयोजन

नांदेड :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी “आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास योजना” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन शुक्रवार 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 4 ते सायं 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

भारत जोडो युवा ॲकडमीचे  तज्ज्ञ संस्थापक डॉ. बेलखोडे हे “आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास योजना” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे. https://meet.google.com/tft-farj-qxd या लिंक वर क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट अ‍ॅप यापूर्वी इनस्टॉल केला नसेल तर इनस्टॉल करुन घ्यावा. आपण गुगल मीट अ‍ॅप मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रात सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु करून विचारावे व लगेच  माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड 02462-251674 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT