file photo 
नांदेड

नांदेड : मोक्कातील आरोपी पोलिस कोठडीत, जुना मोंढा परिसरात केला होता गोळीबार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पिस्तुल व खंजरचा धाक दाखवून व्यापारी व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीकडून खंडणी उकळणारी टोळी मागील काही वर्षापासून कार्यरत होती. या खंडणीखोर आरोपींवर नुकताच इतवारा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारीवर नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्यात आला होता. यातील सहा आरोपींना कारागृहातून अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश एस. एस. खरात यांनी त्यांना सात दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

ता. चार ऑक्टोबर रोजी जुना मोंढा परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या सहा युवकांवर इतवारा पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी भेट दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकांनी ता. १६ ते २१ आॅक्टोबर दरम्यान आरोपींना अटक केली. तेंव्हापासून ते कारागृहात होते.

याबाबत व्यापारी विजय मोहनदास धनवानी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात विशाल गंगाधर आंबे (वय २२) राहणार शिवशक्तीनगर कलामंदिरजवळ नांदेड, आदर्श उर्फ आद्या अनिल कामठेकर (वय २०), संजू किशन गुडमलवार (वय २४), धनराजसिंह उर्फ राणा दीपकसिंह ठाकुर (वय १८) राहणार शिवशक्तीनगर कलामंदिर, लखन दशरथसिंह ठाकुर (वय २८) राहणार चिखलवाडी, प्रसाद नागनाथ अवधूतवार (वय १९) राहणार चिखलवाडी या सर्वांनी संगणमत करुन पिस्तुलचा वापर करत आकाशसिंह राजेशसिंह परिहार याला जखमी केले होते. तसेच धनवाणी यांच्या दुकानातील दहा हजार रुपयाची लूट केली होती. 

त्यांच्याविरुद्ध मोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण कायद्याप्रमाणे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास इतवाराचे पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांच्याकडे वर्ग झाला. त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गंगाराम जाधव आणि तिरुपती तेलंग यांनी या मोक्का न्यायालयात ता. १७ डिसेंबर रोजी सर्व सहा आरोपींना मोक्का कायद्यानुसार अटक केली. या सहा आरोपींना मोक्का न्यायालयात हजर करुन तपासासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. न्यायाधीश एस. एस. खरात यांनी या सहा आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडीत पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Election Result: 'तो' शब्द धनंजय मुंडेंनी खरा करुन दाखवला; परळीत मारली बाजी, तर गंगाखेडची जागा...

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: गडचिरोली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या ॲड. प्रणोती निंबोरकर विजयी

Siddhi Vastre : २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे बनली नगराध्यक्ष, शिवसेनेचा मोहोळ नगरपरिषदेत मोठा विजय

Nagar Parishad Election Result : 'साम टीव्ही'चा एग्झिटपोल तंतोतंत खरा! नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष; महाविकास आघाडीला किती जागा?

Municipal Council Election: सत्तेचा खेळ महायुतीने जिंकला! मविआला नगरपरिषदांमध्ये जबर धक्का बसला; आघाडीचा डाव नेमका कसा फसला?

SCROLL FOR NEXT