file photo
file photo 
नांदेड

नांदेड : फुटाने विक्री करणाऱ्याचा मुलगा होणार डॉक्टर, निटमध्ये ७२० पैकी ६२५ गुण

मिलिंद सर्पे

किनवट (जिल्हा नांदेड) : आयुष्यात काही करायची जिद्द असेल तर मनुष्याला कोणत्याही प्रकारची परिस्थिती त्याच्या जिद्दीला साकार करण्यापासून आडवू शकत नाही. असेच एक ज्वलंत उदाहरण शहरात समोर आले आहे. शहरातील शिवाजी चौकात फुटाने, लाह्या, गाठी विक्री करणाऱ्या फकिरराव जुनगरे यांच्या मुलाने वैद्यकीय शिक्षणाकरीता आवश्यक असलेल्या निट या परिक्षेत ७२० पैकी ६२५ गुण प्राप्त करुन आई वडीलांच्या परिश्रमाचे चिज केले आहे.


रामप्रसाद फकिराराव जुनगरे याने वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्रता परिक्षा म्हणजे निट परिक्षेत ७२० पैकी ६२५ गुण प्राप्त करुन संपूर्ण भारतात ऑल इंडीया रॅँक १०१५९ प्राप्त केली, तर प्रवर्ग एन.टी-१ मध्ये ७५० वी रॅक प्राप्त केली. राज्यात एन.टी प्रवर्गात ३ री रॅक प्राप्त केली आहे. त्याच्या या नेत्रदिपक यशामुळे बाजारपेठेत एका रात्रीतून त्याच्या वडीलांची ओळख निर्माण झाली आहे. रामप्रसादचे इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण महात्मा फुले विद्यालय, गोकुंदा (ता.किनवट) येथे झाले. इयत्ता ११ व १२ वी चे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे झाले. पुणे येथे वास्तव्यास असताना महानगर पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, शिवाजीनगर येथे तो राहत होता. त्यावेळी त्याच्या बुध्दीमत्तेची चमक पुणे येथिल ‘लाईफ फॉर इंप्लिमेंट’ या एनजीओ संस्थेला माहित झाली. या संस्थेने त्याला कोचिंग पुरवली या कोचिंगमध्ये त्याला पुणे येथिल डॉ.अतुल ढाकणे यांनी सहकार्य केले.


त्याचे आई वडील हे किनवट शहरात संसाराचा गाडा चालवण्यासाठी शहरातील शिवाजी चौकात फुटाने, लाह्या, गोड गाठी विकतात. रामप्रसादची आई याकामी त्याच्या वडीलांना साथ देते व घरात फुटाने फोडण्यसह विविध कामात हातभार लावते. जुनगरे कुटुंबाने केलेला संघर्ष हा समाजासाठी एक आदर्श आहे. आता समाजातील दानशुर व उदार सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येउन समाजातील अशा गुणवंत विद्यार्थ्यांला सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन समाजातील विविध स्तरातून होत आहे. कारण रामप्रसाद सारख्या गुणवंतांना वाव दिले तर समाजाला एक उच्च कोटीचा डॉक्टर प्राप्त होणार आहे.

संपादन-  स्वप्नील गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT