file Photo 
नांदेड

नांदेड - एसटी विभागास महिण्याला यामुळे होतोय सव्वातीन कोटीपेक्षा अधिकचा तोटा

शिवचरण वावळे

नांदेड - एसटी महामंडळ आर्थिक डबघाईला आलेले महामंडळ म्हणून ओळखले जाते. आधिच तोट्यातून प्रवास करत असलेल्या या महामंडळाच्या नांदेड विभागास मागील वर्षाच्या तुलनेत महिण्याला तीन कोटी २७ लाख इतका तोटा सहन करावा लागला आहे. 

मागील वर्षी नांदेड विभागास एक कोटी ८७ लाख रुपये इतका तोटा होता. तो वाढून डिसेंबर अखेरपर्यंत तीन कोटी २७ लाख इतका झाला आहे. विशेष म्हणजे सतत होणारी डिझेल दरवाढ आणि प्रवास भाडे जैसे थेच असल्याने एसटी महामंडळास हा तोटा सहन करावा लागत आहे. डिसेंबर २०२० मध्ये नांदेड विभागातील बस ६४ लाख ९० हजार किलो मीटरपर्यंत धावल्या आहेत. यातून विभागास १७ कोटी चार लाख ५६ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. 

महिण्याकाठी २१ कोटी ३२ लाख ४३ हजार रुपये इतका खर्च 

मात्र लॉकडाउनदरम्यान शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग यासह प्रवाशांची संख्या देखील रोडावली होती. असे असताना देखील महामंडळास मिळालेल्या उत्पन्नातुन कर्मचारी यांचे पगार, पेट्रोल, टोल नाके व विविध मार्गाने महामंडळाच्या तिजोरीतून महिण्याकाठी २१ कोटी ३२ लाख ४३ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. 

शाळा सुरु झाल्याने उत्पन्नात वाढ होईल अशी शक्यता 

दरम्यान मुंबईतील लोकलसेवा बंद असल्याने बेस्टवरील प्रवाशांचा तान कमी करण्यासाठी नांदेड विभागातुन बांद्रा व सांताक्रुझ बसस्थानकास ३७ ते ४२ बस पाठविण्यात आल्या आहेत. त्यासोबत चालक, वाहक ३०० आणि इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी असे मिळून साडेतीनशेपेक्षा अधिक कर्मचारी मुंबईत १५ दिवस सेवा देत आहेत. त्यामुळे नांदेड विभागातील बसचे शेड्यूल काही प्रमाणात का होईनी त्यावर परिणाम झाला असल्याचे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. बुधवारी (ता.२७) जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंचे वर्ग सुरु झाल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT