Nanded teacher help 51000 for marriage of orphan girls sakal
नांदेड

नांदेड : शिक्षकाची अशीही सामाजिक बांधिलकी

तीन महिन्यांत अनाथ मुलींच्या लग्नाकरिता केली ५१ हजार रुपयांची मदत

बंडू माटाळकर

निवघा बाजार : आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण पैशाच्या मागे धावतांना दिसतो. कितीही पैसा असला तरी आणखी जास्त कसा पैसा मिळवता येईल म्हणून माणूस प्रयत्नशील दिसून येतो. परंतू कुठे गोर गरीब कुटूंबाला अनाथ, भिक्षेकरी, गोर गरीबांच्या मुलीच्या लग्ना करीता मदत करायची म्हटल्यांवर अनेक जण नाक मुरडतात. परंतू आजच्या कलयुगात एक अवलीया शिक्षक सटवाजी पवार हे दर वर्षी अनाथ व गोर गरीब मुलीच्या लग्नाकरीता कन्यादान म्हणून संसार उपयोगी साहीत्य भेट देतात.

हदगाव येथे विवेकानंद विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कमाईतून ते दर वर्षा दहा टक्के रक्कम दान धर्म करतात. त्यांचे वडील पण गरीबांना अनेकांना मदत करीत होते. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगीतले. सटवाजी पवार गुरुजी यांनी निवघा बाजार परीसरातील तीन महीण्यात अनाथ मुलीच्या लग्नाकरीता जवळपास ५१ हजार रुपयांचे संसार उपयोगी साहीत्य कन्यादान रुपी भेट दिले.

साप्ती येथील वडीलांचे छत्र हरवलेल्या व अत्यंत गरीब असलेल्या आरतीच्या लग्नाकरीता ११ हजार रुपयाची भांडी भेट दिली. तर कोळी येथील मुलीच्या लग्नाकरीता ११ हजार रुपयांची भेट दिली. हदगाव, बोरगाव, जवळगाव येथील अनाथ मुलीच्या लग्नाकरीता साहीत्य घेऊन दिले. सटवाजी पवार यांनी तीन महीण्यात पाच अनाथ मुलीच्या लग्नाकरीता जवळपास ५१ हजारांची मदत केल्याचे त्यांनी सांगीतले.

मी माणसात देव पाहतो, अडल्या नडलेल्यांना मदत करणे ही माझ्या वडीलांची शिकवणी होती. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. पुढच्या वर्षी अनाथ मुलींचे लग्न, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरीता किमान एक लक्ष रुपये मदत या रुपयाने भेट देण्याचा मानस आहे. एखाद्या गरीबाला मदत करुन जे आत्मीक समाधान मिळते ते कुठेच मिळत नाही.

- सटवाजी पवार, शिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीत दिल्ली-NCRमध्ये हवा बनली विषारी, श्वास घेणंही कठीण; AQI ४००च्या वर, १२ कलमी अ‍ॅक्शन प्लॅन लागू

Solapur Accident: इंचगावजवळ अपघातात एक ठार, एक जखमी; पिकअपची दुचाकीला मागून धडक; राष्ट्रीय महामार्गावर घटना..

Ramraje Naik-Nimbalkar: आता लढायचं, पक्ष कुठला ते नंतर बघू: रामराजे नाईक-निंबाळकर; कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेमकं काय म्हणाले?

Minister Muralidhar Mohol: जैन बोर्डिंग व्यवहाराशी संबंध नाही: राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ; मी संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर व्यवहार, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News : महाराष्ट्राला केंद्राकडून १५६६ कोटींची मदत; पूरग्रस्तांसाठी दिलासा

SCROLL FOR NEXT