Nanded third in state crop register farmer e peek pahani sakal
नांदेड

पीकपेरा नोंदणीत राज्यात नांदेड तिसरा

मराठवाड्यात प्रथम; रब्बीतील नोंदणीसाठी उरले पाच दिवस

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्यात ई - पीक पाहणी मोहिमेंतर्गत रब्बीतील पीकपेरा नोंदणी सध्या सुरू आहे. २१ फेब्रुवारीपर्यंत राज्यात सरासरी पेरणी क्षेत्राच्या १६ टक्के पीकपेरा नोंदणी झाली. यात सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यात ६२, वाशीम ४३ तर नांदेडला ४१ टक्के नोंदणी झाली. नोंदणीत नांदेड जिल्हा राज्यात तिसरा तर मराठवाड्यात प्रथमस्थानी आहे. राज्यात मागील वर्षी खरीप हंगामापासून महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे.

‘माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरा’ या घोषवाक्याच्या आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी उपक्रमाची सुरुवात १५ ऑगस्ट २०२१ ला झाली होती. त्यासाठीच्या अॅपद्वारे राज्यात गतवर्षी ९८ लाखांपेक्षा अधिक शेतकरी खातेदारांनी नोंदणी केली होती. सध्या रब्बी हंगामात पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. यासाठी राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरील पीक पाहणीची कालमर्यादा १५ फेब्रुवारीवरून २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. सध्या सुरू असलेल्या पेरा नोंदणीच्या कार्यक्रमात २१ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील ५१ लाख १९ हजार ८९८ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १६ टक्क्यांनुसार आठ लाख १९ हजार २६७ हेक्टर क्षेत्रावरील पेरणीची नोंदणी झाली आहे.

राज्यात बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ७८ हजार ४३६ हेक्टर क्षेत्राचा ६२ टक्क्यांनुसार एक लाख १० हजार ७६९ हेक्टरवरील पेरा नोंदला आहे. वाशीममध्ये ८२ हजार १६६ हेक्टरपैकी ४३ टक्क्यांनुसार ३५ हजार ६१७ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात एक लाख १४ हजार २२३ सरासरी क्षेत्रापैकी ४१ टक्क्यांनुसार ५७ हजार ५९१ हेक्टरवरील पेरा नोंद झाला आहे.पीकपेरा नोंदणीत राज्यात नांदेड जिल्हा तिसऱ्या तर मराठवाड्यात पहिल्या स्थानी आहे. प्रत्यक्ष पेरणी झालेल्या उर्वरित क्षेत्राची नोंदणी येत्या सोमवारपर्यंत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, एनआयसीमधील अव्वल कारकून शिवानंद स्वामी, मीना सोलापुरे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT