वाई बाजार फोटो
वाई बाजार फोटो  
नांदेड

नांदेड : पालखी सोहळ्यात अंध दाम्पत्याचा आंतरजातीय विवाह सोहळ्याला पंच क्रोशीतील हजारोंची उपस्थिती

साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील वडसा येथे डोळ्याचे पारणे फेडणारा सद्गुरू संत बाळु मामा पालखी सोहळा एक ग्राममहोत्सव म्हणून साजरे केले जात आहे. आसपासच्या खेडेगावातील दररोज हजारो महिला पुरुष हजेरी लावत असून पालखी सोहळाच्या मंचावर काल (ता. तीन) रोजी माहूर किनवट तालुक्याच्या मातब्बर राजकीय नेत्यांच्या साक्षीने परिसरातील अंध दिव्यांग जोडप्याचा आंतरजातीय विवाह मोठ्या थाटात पार पडला.

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथून मार्गस्थ झालेली सद्गुरू संत बाळूमामा पालखी सोहळा क्रमांक १३ मेंढी गट सध्या माहूर तालुक्यातील वडसा येथील नागनाथ नगरी परिसरात थांबलेले आहेत.मुक्या प्राण्यांची निर्मम हत्या थांबविणे,अंधश्रद्धा निर्मूलन, शेळी, मेंढी पालनाला प्रोत्साहन देणे. आदी समाजकार्यासह अध्यात्मिक भजन, कीर्तनाचा वसा घेत गावोगावी थांबून भंडारा कार्यक्रम व इतर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून पालखी सोहळ्याच्या माध्यमातून लोकांचे समाज प्रबोधन केले जात आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागल्याने सामूहिक विवाह सोहळे, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रम जवळपास वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळेच की काय माहूर तालुक्यातील वडसा येथे सुरु असलेल्या संत बाळूमामा पालखी सोहळ्याच्या भंडारा कार्यक्रमाला दररोज हजारोंच्या संख्येने आसपासच्या खेडेगावातील महिला पुरुष मंडळीची उपस्थित राहत असल्याने वडसा नागनाथ नगरीला उरुसाचे स्वरूप आले आहे.

रविवारी (ता. तीन) संध्याकाळच्या सुमारास आरती झाल्यानंतर पडसा येथील ललिता कामाजी लकडे व टाकळी येथील ज्ञानेश्‍वर व्‍यंकटी तरटे या अंध दिव्यांग दाम्पत्यांचा आंतरजातीय विवाह हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.यावेळी नव वधूवराला पालखी सोहळा व्यवस्थापन समितीकडून संसारोपयोगी साहित्य, सौभाग्य लेणे आदी भेट वस्तू देण्यात आले. तर समाधान जाधव यांच्याकडून पाच हजार रुपये रोख भेट दिल्यानंतर उपस्थितांनी दिव्यांग वधू- वराला रोख रकमेसह आशीर्वादाचा वर्षाव केला. किनवट माहूर तालुक्यातील राजकीय मातब्बर पुढाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या पुरोगामी विवाह सोहळ्याला पंच क्रोशितील हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. पालखी सोहळ्यात येणाऱ्या महिला पुरुषांच्या बैठक व्यवस्था भंडारा इत्यादी कार्यक्रमासाठी वडसा येथील सर्व धर्मिय ग्रामस्थांनी अथग परिश्रम घेतले.

संत बाळु मामा पालखी कार्यक्रमा दरम्यान पार पडलेल्या अंध दाम्पत्याच्या आंतरजातीय विवाह सोहळ्याला आमदार भीमराव केराम, योगी शाम भारती महाराज, जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, किनवट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन दादा नाईक, भारतीय जनता पक्षाचे सुमित राठोड, माहूर नगरपंचायतचे नगरसेवक गोपू महामुने, काँग्रेसचे दिलीप मुंगीलवार, कैलाश बेहेरे यांची विशेष उपस्थिती होती.

कर्नाटक राज्यातील अकोळ जिल्हा बेळगाव या ठिकाणी ०३ ऑक्टोंबर १८९२ साली जन्मलेले सद्गुरू संत बाळूमामा यांनी आपल्या उभ्या आयुष्यात दीन दुबळ्या समाजातील अंधश्रद्धा दूर केली. मुक्या प्राण्यांची हत्या बंद व्हावी या हेतूने संत बाळूमामा यांनी ७४ वर्ष अवतार कार्य केले. १९६६ साली आदमापुर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी संजीवन समाधी घेतली होती. समाधीनंतर ५६ वर्ष त्यांच्या भक्तांनी ही परंपरा कायम ठेवली. अशी माहिती पालखी व्यवस्थापक निलेश सूर्यकांत भोसले यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT