Nanded Sakal
नांदेड

Nanded : कोणत्याही अकॅडमीकडे एकही दिवस क्लासेस न करता वंदना गिरी बनल्या पोलिस उपनिरीक्षक

तिच्या यशाबद्दल धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाच्यावतीने तिचा येथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

देगलूर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाची विद्यार्थीनी वंदना अविनाश गिरी हीची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

वंदना गिरी ही तालुक्यातील माळेगाव येथील रहिवाशी असून ती धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली आहे.

कोणत्याही अकॅडमीकडे एकही दिवस क्लासेस न करता केवळ स्वयंअध्ययन करून पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी देगलूर तालुक्यातील ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

तिच्या यशाबद्दल धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाच्यावतीने तिचा येथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून मनोगत व्यक्त करताना आपल्या स्पर्धा परीक्षेची पायाभरणी धुंडा महाराज महाविद्यालयातच झाल्याचे तिने सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय अवधानी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणपत कारिकंटे यांनी केले. प्रा विश्वंभर तिडके यांनी प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. रवींद्र बेम्बरे यांनी आभार मानले.

या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश कुकाले, प्रा. विठ्ठल जाधव, डॉ. आनंद आतनूरकर, डॉ. आनंद वळंकीकर, प्रा. अनिल ठोसरे, डॉ. गोविंद रामदिनेवार, प्रा. अंजली रोयलावार, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. संजीवनी नेरकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

एका क्षणात सगळं बदललं ! मधू कांबीकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, स्टेजवर नाचल्या, अन्...!

सारा तेंडुलकरच्या बर्थडे पार्टीत तिला घट्ट मिठी मारणारा तो तरुण कोण? वहिनी सानिका पाहतच राहिली; Video Viral

SCROLL FOR NEXT