फोटो
फोटो 
नांदेड

कामगार कृती समिती आंदोलनाने नांदेड हादरले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात कामगार कृती समितीच्या वतीने देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. देशव्यापी आवाहनानुसार शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (ता. चार) निदर्शने करण्यात आली. त्या निदर्शने आंदोलनामध्ये शेत मजूर युनियन (लाल बावटा) व सीटूच्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन आंदोलन यशस्वी केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना रीतसर परवानगी मागितली होती. परंतु त्यांच्या कार्यालयामार्फत परवानगी नाकारली होती.

मात्र आंदोलन ठरल्याप्रमाणे कॉ. विनोद गोविंदवार (राज्य उपाध्यक्ष शे.म.यु.लाल बावटा) आणि कॉ. गंगाधर गायकवाड (जनरल सेक्रेटरी सीटू नांदेड जिल्हा) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तेव्हा पोलीस प्रशासन व युनियनच्या पुढाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. या आंदोलनात साधारणतः दोनशे कामगारांनी सहभाग नोंदविला. प्रमुख पदाधिकाऱ्यांना वजिराबाद पोलिसांनी अटक करून दोन तासांनी सोडून दिले. या निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व कॉ. विनोद गोविंदवार, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. मंजूश्री कबाडे, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ. देवराव नारे, कॉ. अर्जून खोरडे आदींनी केले.

हेही वाचा नांदेडमधून भाजप प्रदेश कार्यकारिणीवर ‘यांचा’ समावेश ​

दुसरे आंदोलन

नांदेड शहरातील आशा वर्करच्या मागण्या घेऊन सीटू राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोविड- १९ प्रोत्साहन भत्ता पाच हजार रूपये व आक्टोबर २०१८ चे रेकॉर्ड किपींगचे थकीत मानधन मिळवून घेण्यात यश आले. महापालिकेमध्ये झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. उज्वला पडलवार, रेखा धूतडे, कॉ. शरयू कुलकर्णी, द्रोपदा पाटील आदींनी केले.

तिसरे आंदोलन

आयटकचे कॉ. ॲड. प्रदीप नागापूरकर, कॉ. विजय गाभणे, कॉ. के. के. जांबकर, कॉ. श्याम सोनकांबळे, कॉ. गौतम सुर्य यांच्या नेतृत्वाखाली भाकपच्या लाल बावटा कार्यालयात पार पडले. या आंदोलनात कृती समितीच्या आयटक, सीटू, शेत मजूर युनियनच्या कामगार व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. कॉ. ॲड. प्रदीप नागापूरकर यांनी जनविरोधी धोरणे व सत्ताधाऱ्यांनी चालविलेली हुकूमशाही या विरोधात आपल्याला आवाज ऊठवावाच लागेल असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप व आभार कॉ. विनोद गोविंदवार यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT