file photo
file photo 
नांदेड

सुखद बातमी : व्हॉटसॲप ग्रुपची अशीही संवेदनशीलता, त्या कुटुंबाला दिले २६ हजार ६०० रुपये व मोफत औषधी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : गेल्या काही वर्षात सोशल मिडिया हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. बहुतांश सोशल मिडिया ग्रुपवरुन निष्फळ व बिनकामाचे संदेश, मुद्दे यावर भर दिला जातो. परंतु शहरातील एका व्हॉटस्ॲप ग्रुपने सामाजिक संवेदनशीलता जोपासत एका असहाय्य व आजारी कुटुंबासंदर्भातील ई- सकाळच्या वृत्ताची दखल घेत मदतीचा हात पुढे केला आहे. २६ हजार ६०० रुपये रोख व मोफत औषधी या कुटुंबाला नुकतीच सुपूर्द करण्यात आली आहे.

मूळचे किनवट तालुक्यातील विजय काळे हे किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना दर चार दिवसाला डायलेसिस करावे लागते. त्यामुळे त्यांनी आपले बिऱ्हाड नांदेडला हलविले. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. तिचे नाव ज्योत्सना असून तिने दहेली तांडा येथून बारावी कला शाखेतून प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे. परंतु वडिलांच्या उपचारासाठी व चरितार्थ चालविण्यासाठी तिने नांदेड शहरात हातगाड्यावरुन भाजीपाला विक्री सुरु केली आहे.

ई- सकाळच्या बातमीची दखल व कौतुक

याबाबतचे वृत्त ईसकाळमध्ये प्रकाशित झाल्यावर 'नांदेड समस्या आणि उपाय' या व्हॉटसॲप ग्रुपवर या बातम्या फॉरवर्ड झाल्या. त्यानंतर या गुपचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते राज लाहोटी यांची संवेदना जागृत झाली आणि त्यांनी काळे कुटुंबाला भेटून माहिती घेत काय मदत करता येईल याकडे लक्ष दिले.

हे आहेत दानशुर नांदेडकर

परिणामी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील संवेदनशील मंडळींनी पुढाकार घेत काळे कुटुंबाला यथाशक्ती मदत दिली. डॉ. बोखारे १ हजार, परमानंद तोष्णीवाल ११००, ॲड.विनोद कदम ११००, ईश्वर यादव ५००, नितीन देबडवार १ हजार,मनपाचे उपायुक्त ॲड. अजितपालसिंघ संधू २१००, बालाजी चौधरी ११००, राज लाहोटी १५००, लोहिया ५००, पवन १५००, शंकर कुलकर्णी ५००, नीलेश सांगडे ३००१,डॉ. राहुल लव्हेकर ११००, कर सल्लागार गंगाबिशन कांकर ५००,सुधीर देशमुख १ हजार रुपये, डॉ.सचिन १५००, डॉ.अरुण मान्नीकर २१००, डॉ. मोरे १ हजार, भुसारी १ हजार, गणेश महाजन १ हजार रुपये, डॉ.तगडपल्लेवार १ हजार रुपये, दीपक इरमलवार ५०० रुपये यांचा समावेश आहे. ही एकूण रक्कम २६ हजार ६०० रुपये संकलित करण्यात आली.

विजय कबाडे यांचाही खारीचा वाटा 

तसेच ज्योत्सनासाठी कपडे, मिठाई आदी भेट भोकरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली. ही सर्व मदत ३० नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयातील छोटेखानी कार्यक्रमात विजय काळे, ज्योत्सना काळे यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी राज लाहोटी, कर सल्लागार गंगाबिशन कांकर, काळेंचे घरमालक चौधरी, प्रल्हाद कांबळे, विश्वास गुंडावार, दीपक इरमलवार, कृष्णा उमरीकर उपस्थित होते.

गरजु रुग्णाला मोफत औषधी 

विशेष म्हणजे विजय काळे यांना किडनी उपचारासाठी लागणारी मेरालोल, ॲसिपॉझ डीएसआर, कॅल्शियमच्या प्रत्येकी १०० गोळ्या मेडिसन फार्माचे मालक रमेश मेगदे, सचिन देशपांडे, सुनील देशपांडे यांनी क्षणाचाही विचार न करता डॉ. अरुण मान्नीकर यांच्यामार्फत पाठवून दिल्या आहेत असे लाहोटी यांनी कळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT