प्रणिता देवरे-चिखलीकर sakal
नांदेड

Nanded : चालण्याचा व्यायाम तंदुरुस्तीसाठी आवश्यकच ; प्रणिता देवरे-चिखलीकर

योग सप्ताहात चालण्याची स्पर्धा

प्रमोद चौधरी

नांदेड : सद्यस्थितीत स्पर्धा तीव्र झालेली असून, प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आले. त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. मात्र, आपले दैनंदिन जीवन कितीही व्यस्त असले तरी, स्वतःच्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी दररोज सकाळी चालण्याचा व्यायाम तंदुरुस्तीसाठी आवश्यक असल्याचे मत, संयोजिका प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी केले आहे.

मोदी @ 9 अंतर्गत भाजपच्या योग सप्ताहात अॅड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन योग सप्ताहाच्या संयोजक प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या हस्ते रविवारी (ता.18) झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेत ३२२ स्पर्धकांनी भाग घेत भरभरून प्रतिसाद दिला. सतत २१ व्या वर्षी विविध १० गटातील विजेत्यांना कच्छवेज गुरुकुलतर्फे मोबाईल पारितोषिके देण्यात आले.

रविवारी सकाळी श्रीराम सेतु पुल गोवर्धन घाट नांदेड येथे भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा संघटन मंत्री संजय कोडगे होते. महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विविध दहा गटात संतोष चेनगे, प्रियंका मामीडवार, आनंद सोनटक्के, माधव हुलगंडे, अरविंद मस्के, संजीवनी चव्हाण, शीला भालेराव,जयश्री उन्हाळे, संतोष चेनगे, मोहन पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला.

डॉ. सचिन उमरेकर, शिक्षण तज्ज्ञ बालासाहेब कच्छवे, प्रकाशसिंह परदेशी, सुरेश लोट, विक्रांत देशपांडे, शशिकांत घोरबांड, नीता दागडिया, जयश्री ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. चुरशीच्या लढतीत दिगंबर शिंदे, संभाजी शादुलवाड, बालाजी लाटकर, विष्णू भंडारी, वैशाली बामनकर, सीमा निरणे, वैष्णवी कोडगिरे, सावित्री सिताफळे, बालाजी लाटकर, कैलास जायभाये यांनी दुसरा क्रमांक मिळवला. सुभाष देवकते, सुप्रिया क्षीरसागर, सीमा निरणे, चंद्रभान सूर्यवंशी, पंढरीनाथ कंठेवाड, चक्रधर खानसोळे, विष्णू भंडारी, अनिता गुप्ता, शिल्पा भालेराव, दामोदर मुंडे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

प्रत्येक गटातील यशस्वी तिघांना मंगल कार्यालय व टेन्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफीज देण्यात आल्या. भाजपचा झेंडा दाखवून विविध गटाच्या स्पर्धेची सुरुवात अॅड. चिरंजीलाल दागडिया, महेश खोमणे, डॉ. शितल भालके, अनुराधा गिराम, अपर्णा चितळे, प्रगती नीलपत्रेवार, राजेश यादव यांच्या हस्ते करण्यात आली.

स्पर्धेचे सूत्रसंचालन धीरज स्वामी व दिगा पाटील यांनी केले. पंच म्हणून अरुण काबरा, गजानन मामीडवार, बालाजी कवानकर, कालिदास निरणे, सुधाकर ब्रह्मनाथकर यांनी काम बघितले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुहास क्षीरसागर, तिरुपती गुट्टे, लक्ष्मीकांत पाठक, सुरेश दलबसवार, अरुण लाठकर, शशिकांत कुलकर्णी, संतोष भारती यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT