file photo 
नांदेड

नांदेड : बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून युवकाचा खून, आरोपीला कोठडी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून तिच्या प्रियकरावर सख्या भावाने धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. ही घटना ता. तीन डिसेंबर रोजी मुखेड शहराच्या शनिदेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या माळरानावर घडली. मुखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सय्यद सलीम सय्यद फकीर (वय २०) वर्षे याने आरोपी सय्यद शादुल्ला सय्यद युसुफ (वय २१) रा. भोकर किनवट रोड नांदेड याच्या बहिणीचे प्रेमसंबंध जुळले होते. ते एकमेकांच्या संमतीने पळून गेले होते. त्याचाच राग मनात धरुन तिचा भाऊ सय्यद शादुल याने ता. तीन डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता सय्यद सलीम सय्यद फकीर हे दोघेजण नात्यातील असल्याने दारु पिण्यासाठी मुखेड शहराच्या शनिदेव मंदिराच्या बाजूस गेले. दारु पिल्यानंतर शादुल्ला याने सय्यद सलीम याचा खून केला. यानंतर पोलिसात गुन्हा दाखल होताच सय्यद शादुल यास पोलिस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ता. सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नामदेव रिठे करत आहेत.

पहिली असताना दुसऱ्यांदा बोहल्यावर गुन्हा दाखल

वडापावचा गाडा टाकण्यासाठी माहेराहून २५ हजाराची मागणी करुन दुसरा विवाह करणाऱ्या पतीविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धापूर शहरातील समतानगर येथील विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती शैलेश सिकंदर, सासु जनाबाई कीर्तन, सासरा भीमराव किर्तन, ज्ञानसागर कीर्तन यांच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

"फिजिकल रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट आहे का?" कंगनाने रणबीर कपूरला थेट विचारलं होतं... काय आहे किस्सा?

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग मध्ये नवा वाद; डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्या भांडणाचा Video Viral

SCROLL FOR NEXT