नांदेड जिल्हा परिषदेत कृषीदिन साजरा 
नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेत आगळा वेगळा कृषीदिन साजरा 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या समवेत विविध फळपिकांची रोपे जसे चिंच, पेरु, लिंब, आवळा इत्यादी देवून नाविन्यपूर्ण पध्दतीने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषि दिनाचा कार्यक्रम बुधवारी (ता. एक) झाला.

जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या संकल्पेनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सुशिला पाटील बेटमोगरेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रवीशंकर चलवदे, माजी कृषि संचालक सुरेश अंबुलगेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल ठोंबरे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार, कार्यकारी अभियंता श्री. रायभोगे, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर, श्री. शिंदे, बास्टेवाड, के. सी. सुर्यवंशी, श्री. सरोदे, श्री. मोरे, श्री. कल्याणे, श्री. सावतकर आदींची उपस्थिती होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा
जिल्हा परिषद अध्यक्षा अंबुलगेकर यांनी शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याचे सांगून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे मार्गदर्शन केले. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्हा परिषद पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील व कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विविध योजनांचा लाभ द्यावा
कृषि सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी प्रास्ताविकात कृषि व पशुसंवर्धन विभागामार्फत नव्याने राबविण्यात येणाऱ्या व सद्यस्थितीत चालू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सदस्या प्रणिता देवरे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना रोजगार हमी योजनेचा प्रामुख्याने उल्लेख केला. कृषिभूषण शेतकरी रामराव कदम यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळातील स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी राबविलेल्या सिंचन योजनामुळेच संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम - सुफलाम झाला असल्याचे सांगितले.
विद्यापीठातील शास्त्रज्ञ श्री. पांडागळे यांनी विविध तणनाशकाचा कार्यक्षम वापर या विषयावर माहिती दिली. 

शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि दिन बांधावर करण्याची विनंती केली. किटक शास्त्रज्ञ शिवाजी तेलंग यांनी विविध किटक, त्यांच्या अवस्था, किटकनाशकाचा कार्यक्षम वापर व गुलाबी बोंडअळी नियंत्रण यावर मार्गदर्शन केले. मोनसॅन्टो इंडियाचे सतिश काळवाघे यांनी गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी आम्ही शासनासोबत काम करु, असे सांगितले. फेरोमन ट्रॅपचा वापर करण्याची विनंती केली. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना किटक नाशकाची फवारणी करताना वापरावयाच्या सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
कृषि अधिकारी पुंडलीक माने यांनी सुत्रसंचालन केले तर जिल्हा कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी कृषि अधिकारी संभाजी कऱ्हाळे, गजानन हुंडेकर, संजय चंद्रवंशी, श्री. हाळे, श्री. कासराळीकर, श्री. चालीकवार आदींनी परिश्रम घेतले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT