Nanded Zilla Parishad election sakal
नांदेड

नांदेड : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आरक्षण सोडत

स्थानिक नेत्यांना धक्का : ३७ गट महिलांसाठी राखीव

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागलेल्या मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यपदासाठी गुरूवारी सुधारीत आरक्षण सोडत झाली. या ७३ जागांपैकी ३७ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यात एससी सात, एसटी चार आणि ओबीसींच्या आठ जागांचा समावेश आहे. उर्वरीत ३६ जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्या आहेत. चर्चेतील लिंबगाव, वाडी बुद्रुक गट खुला प्रवर्ग, वडेपुरी अनुसुचित जाती महिला व धनेगाव गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी सुटला आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांना धक्का बसला आहे तर काही नेत्यांच्या गटाचे आरक्षण बदल्याने दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ७३ गटासाठीची आरक्षण सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांसह विविध पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

एससी, एसटी व ओबीसी गटाचे आरक्षण

१) माहूर ः लखमापूर (अनुसुचित जमाती), वाई (अनुसुचित जाती)

२) किनवट ः मोहपुर (अनुसुचित जाती महिला), गोकुंदा (अनुसुचित जाती महिला), बोधडी बुद्रुक (अनुसुचित जाती), इस्लापूर (अनुसुचित जाती)

३) हिमायतनगर ः दुधड (अनुसुचित जाती)

४) हदगाव ः मनाठा (ओबीसी महिला), आष्टी - (ओबीसी),

५) अर्धापूर ः लहान (अनुसुचित जमाती महिला), मालेगाव (ओबीसी)

६) नांदेड ः वाजेगाव (ओबीसी - महिला), धनेगाव - (ओबीसी - महिला)

७) भोकर ः भोसी (अनुसुचित जाती महिला), पिंपळढव (अनुसुचित जाती महिला),

८) उमरी ः तळेगाव (अनुसुचित जमाती)

९) बिलोली ः आरळी (अनुसुचित जमाती महिला), रामतीर्थ (ओबीसी)

१०) नायगाव ः बरबडा (ओबीसी - महिला), कुंटूर (ओबीसी), देगाव (अनुसुचित जमाती), मांजरम (ओबीसी)

११) लोहा ः सोनखेड (अनुसुचित जाती), वडेपुरी (अनुसुचित जाती महिला), उमरा (ओबीसी महिला), कलंबर बुद्रुक (अनुसुचित जाती), सावरगाव (अनुसुचित जाती पुरुष), माळाकोळी (ओबीसी)

१२) कंधार ः शिरढोण ः (ओबीसी - महिला), बहाद्दरपुरा (अनुसुचित जाती महिला), गौळ (अनुसुचित जाती महिला),

१३) मुखेड ः जांब बु. (अोबीसी), एकलारा (ओबीसी - महिला), सावरगाव पि (अनुसुचित जमाती महिला), मुक्रमाबाद (ओबीसी - महिला),

१४) देगलूर ः करडखेड (अनुसुचित जमाती महिला)

सोळा पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

जिल्ह्यातील १६ पंचायत समितीसाठी तालुकास्तरावर सोडत काढण्यात आली. काही ठिकाणी सकाळी अकरा वाजता तर काही ठिकाणी दुपारी चार वाजता सभेद्वारे ही सोडत काढण्यात आली. जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव, लोहा, कंधार, मुखेड व देगलूर येथील पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT