Nanded News sakal
नांदेड

Nanded News : जिल्हा परिषद राबविणार ‘ऑपरेशन गगनभरारी’ ; लोकसहभागातून विविध उपक्रम,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय

जिल्ह्यातील ग्रामिण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकावा, त्यांना उच्च व चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा व शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामिण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकावा, त्यांना उच्च व चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा व शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्दात हेतूने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी लोकसहभागातून ‘ऑपरेशन गगनभरारी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी या उपक्रमाबाबत शिक्षण विभागासह इतर संबंधित विभागांच्या अधिकारी व विभागप्रमुख यांच्या बैठका घेतल्या. त्यानुसार या उपक्रमाचे नियोजन सुरू आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण दोन हजार १९४ शाळा आहेत. त्यात जवळपास एक लाख ८० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या काही शाळा जुन्या व नावाजलेल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषद शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा ओढा कमी होताना दिसून येत आहे. पालकांना आता आपला पाल्य सेमी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावा, असे वाटत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या काही ठिकाणी घटली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन लोकसहभागातून ‘ऑपरेशन गगनभरारी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असा असेल लोकसहभाग...

जिल्ह्यातील १६ तालुक्यात असलेल्या दोन हजार १९४ शाळांमध्ये लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विविध बॅँका, उद्योजक, माजी विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले प्रतिष्ठित व दानशूर मंडळी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी सामाजिक संस्था आदींना या ‘ऑपरेशन गगनभरारी’मध्ये सामावून घेण्यात येणार आहे. त्यांच्या मार्फत शाळांमध्ये विविध सोयी, सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत.

‘शाळा’ही घेणार दत्तक

ऑपरेशन ‘गगनभरारी’ अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासोबतच त्यांच्यासाठी विविध स्पर्धात्मक परिक्षांचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला जाणार आहे. तसेच वाचन संस्कृती वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकासह इतर पुस्तके व शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल या जिल्ह्यातील १६ शाळा स्वतः दत्तक घेणार आहेत. तर जिल्हा परिषदेतील इतर अधिकारी व विभागप्रमुख यांना देखील शाळा दत्तक देण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT