Vande Bharat Express sakal
नांदेड

Vande Bharat Express : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची नांदेडकरांना प्रतीक्षाच! रेल्वे महाव्यवस्थापक प्रवाशांच्या मागणीकडे लक्ष देणार का?

नांदेड विभागात विद्युतीकरण पूर्ण झाले असतानाही नांदेड येथून वंदे भारत सुरू करण्यास प्रतीक्षाच केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

- शरद काटकर

नांदेड - जवळपास सर्व एक्स्प्रेस रेल्वे नांदेड विभागातून विद्युत इंजिनवर धावत आहेत. माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या काळात मनमाड ते जालना विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्याच दरम्यान, काम पूर्ण होऊन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. त्यावेळी केवळ विद्युतीकरणाअभावी जालना ते नांदेड वंदे भारत न सोडता जालना-मुंबई अशी सुरू करण्यात आली आहे.

आता नांदेड विभागात विद्युतीकरण पूर्ण झाले असतानाही नांदेड येथून वंदे भारत सुरू करण्यास प्रतीक्षाच केली जात आहे. दरम्यान, दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन हे गुरुवारी (ता.८) नांदेडमध्ये येत असून, रेल्वेच्या विभागीय कार्यालयास ते भेट देणार आहेत. यावेळी ते कार्यालयीन कामांची पाहणी करणार आहेत. प्रवाशांच्या या मागणीकडे त्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.

नांदेड विभागात सध्या पूर्णा बायपासचे काम परभणी-परळी व अंकाई-छत्रपती संभाजीनगरदरम्यान दुहेरीकरणाचे काम बाकी आहे. भूसंपादनासाठी रेल्वे विभागाकडून निविदा प्रकाशित झाल्या आहेत. परंतु, अद्याप म्हणावी तशी कामास गती मिळालेली नाही. सध्या नांदेड विभागातून नांदेड-पुणे, नांदेड-पनवेल या दोन दैनंदिन धावणाऱ्या रेल्वेंना केवळ सतरा डबे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास सोसून प्रवास करावा लागतो.

यासाठी मागणी असतानाही कुठल्याच प्रकारचे अतिरिक्त डबे वाढविण्यात आले नाहीत. नांदेड विभागात सुरक्षेसाठी रेल्वेमध्ये अतिरिक्त रेल्वे पोलिस फोर्सची आवश्यकता आहे. परभणी-पूर्णा-नांदेड या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म वाढविण्याची अत्यंत गरज आहे. विभागातील काही स्थानकांची कामे कासवगतीने सुरू आहेत. तर, काही ठिकाणी एक वर्ष उलटूनही कामास सुरवात झालेली नाही. यात परभणी रेल्वेस्थानकाचा समावेश आहे.

प्लॅटफॉर्मच्या कमतरतेमुळे रेल्वेंना उशीर

प्लॅटफॉर्मच्या कमरतेमुळे बऱ्याच वेळा परभणीवरून रात्रीच्या वेळी मराठवाडा एक्स्प्रेस नांदेडकडे येताना लिंबगाव, वाणेगाव अथवा नांदेड आवटरला थांबविण्यात येते. त्यामुळे नांदेड येथून रात्री १०.४० वाजता सुटणारी नांदेड-रायचूर एक्स्प्रेससोबत कनेक्शन मिळत नाही.

परभणी येथे केवळ तीन प्लॅटफॉर्म असल्याने बेंगलोर-नांदेड एक्स्प्रेस बहुतांश वेळा प्लॅटफॉर्मच्या कमरतेमुळे परभणीला रोज एक ते दीड तास उशिरा येते. नांदेड स्थानकावर देवगिरी एक्स्प्रेसला प्लॅटफॉर्मच्या कमतरतेमुळे लिंबगाव येथे सक्तीचा थांबा दिला जातो. यामुळे प्रवास कंटाळवाना होतो, असे प्रवाशांनी सांगितले.

विभागातील पूर्णा बायपास, परभणी ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान दुहेरीकरणासह नवीन रेल्वे सुरू करण्याची सातत्याने मागणी होत असताना अजूनही विशेष गाडी सोडण्यात आली नाही. याची दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांनी पूर्तता करण्याची आवश्यकता आहे.

- अरुण मेघराज, रेल्वे प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात, १४४ वर्षांची आहे परंपरा

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT