file photo 
नांदेड

नांदेडकरांना आता ‘याचा’ बसतोय चटका...

अभय कुळकजाईकर

नांदेड - आधीच कोरोनाचा कहर आणि त्यात मे महिना. त्यामुळे नांदेडकरांच्या अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. तापमानातील चढउतार गेल्या आठवडाभरापासून कायम असून उकाड्यापासून सुटका मिळविण्यासाठी आता नांदेडकर प्रयत्न करु लागले आहेत. 

सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनामुळे भारतातही लॉकडाउन सुरु आहे. गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउनमुळे जवळपास सर्व व्यवहार ठप्प आहेत. माणसे घरातच बसून आहेत. यातच उकाड्यात गेल्या काही दिवसापासून वाढ झाल्याने घरात बसणेही असह्य होत आहे. आधीच दीड महिन्यापासून इलेक्ट्रिकलची दुकाने बंद असल्याने घरातील नादुरुस्त असलेले कुलर, पंखे आणि अन्य साहित्य दुरुस्तीसाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत.  
   
हेही वाचा - Video - मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांनी केला ‘कोरोना’मुळे बदललेल्या आयुष्याचा उलगडा...

तापमानात चढउतार कायम
दरवर्षी ४५ अंशांच्या झळा सोसणाऱ्या नांदेड जिल्ह्यात यंदा सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्याने उशीराने उष्णतेची लाट सुरू झाली आहे. ता. एक मे रोजी ४२.५, ता. दोन मे रोजी ४४, ता. तीन मे रोजी ४३.५, ता. चार मे रोजी ४३.५ तर ता. पाच मे रोजी ४३ अंशावर तापमान राहिले असल्याची माहिती वजिराबाद येथील भारतीय हवामान विभागाचे हवामान निरिक्षण केंद्राचे अंशकालीन हवामान निरीक्षक बाळासाहेब कच्छवे यांनी दिली. 

सकाळपासूनच उकाडा सुरु
कमाल बरोबरच किमान तापमानात चढउतार कायम आहे. मंगळवारी दिवसभर उन सावल्यांचा खेळ सुरु होता. तरीही देखील उष्णता कायम होती. सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसु लागले आहेत. मागील चार दिवसांपासून नांदेड चांगलेच तापू लागले आहे. सकाळच्या तापमानातदेखील मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यातील ऊन चांगलेच तापू लागले असून त्याचा त्रास आता सर्वांनाच जाणवू लागला आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - Video - नांदेडला पश्‍चिम बंगालचे कारागीर अडकले...
 
लॉकडाउनमुळे दुकाने बंद 

अनेक इलेक्ट्रिशियन, कारागिरांनी मार्च महिन्यापूर्वी कुलरसाठीची तयारी केली असून त्याचे साहित्य खरेदी केले. सर्वाधिक मागणी अशा कूलरला असल्याने या कुलरचे सुटे भाग आणून कारागीर घरबसल्या असे कूलर तयार करून विक्री करत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो रुपयांची खरेदी करून साहित्य आणले आहे. परंतु, लॉकडाउनमुळे मागणी असूनही कुलर तयार करता येत नाहीत आणि विक्रीदेखील कमी होत आहे. काही ठिकाणी दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली तर काही ठिकाणी नाही, अशी परिस्थिती आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Red object in galaxy : अवकाशात दिसले रहस्यमयी लाल ठिपके, पृथ्वीवर होणार गंभीर परिणाम? नेमका विषय काय, जाणून घ्या..

Anurag Thakur : सशक्त भारतासाठी मोदींची पंचसूत्री आवश्‍यक; माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Latest Marathi News Updates : प्राण गमावलेल्यांच्या कृत्यांबद्दल ऐक्य व्यक्त करण्यासाठी बौद्धनाथ स्तूपाबाहेर मेणबत्ती मार्च

SCROLL FOR NEXT