Nandedkar To Full Hudhudi Cold Increased sakal
नांदेड

नांदेडकरांना भरली हुडहुडी; थंडी वाढली

उबदार कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तरेकडील थंड वारे वाहू लागले आहेत. यामुळे गेल्या आठवड्यापासून शहरात थंडी जाणवू लागली आहे. शहरातील किमान तापमानात घट होऊन मंगळवारी किमान तापमान ११ अंश सेल्सिअस अंशांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे नांदेडकरांची उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे.

यंदा पावसाळा जास्त झाल्याने थंडीचे प्रमाणही वाढण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबर तसेच डिसेंबरचे दोन आठवडे शहरात थंडीचा मागमूसदेखील नव्हता. मात्र, त्यानंतर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून म्हणजेच गेल्या चार - पाच दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापमानात होणाऱ्या चढउतारामुळे शहरात सर्दी, खोकल्यासारखे आजार व व्हायरल इनफेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

सध्या थंडी वाढल्यामुळे हरभरा, गहू या रब्बी पिकांना देखील फायदा होणार आहे. आठवड्याभरात उत्तरेकडून येणाऱ्या शितवारे कायम राहणार असल्याने थंडीचा तडाखा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दोन दिवसांपासून थंडी वाढल्याने नांदेडकरांची शहरातील उबदार कपडे विक्रेत्यांकडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. थंडीमुळे सकाळी व्यायाम करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली असून, थंड पेयांची मागणी कमी होऊन नागरिकांची पावले आता चहाच्या ठेल्यांकडे वळू लागली आहेत.

असे आहेत दर...

  • हाफ स्वेटर - ३०० ते ५०० रुपये

  • फुल्ल स्वेटर - ३५० ते ७००

  • हातमोजे - ७० ते १२०

  • कानटोपी - ७० ते १५०

  • जॅकेट - ८०० ते १५०० पर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: भारत-पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटचा मोर्चा

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT