file Photo 
नांदेड

नांदेडकरांनो सावधान - इंग्लडहून परतलेल्या दोन पैकी एका प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे

नांदेड - काही दिवसांपूर्वी इंग्लडहून भारतात परतलेल्या प्रवाशांमध्ये नांदेडातील दोन प्रवाशांचा समावेश होता. बाहेर देशातून परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील भावाला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

अधिक माहिती देताना डॉ. भोसीकर म्हणाले की, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लडहून दोन प्रवाशी नांदेडात दाखल झाले होते. त्यांची कोरोना चाचणी करुन त्यांना घरी होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या प्रवाशी व्यक्तीस श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधित प्रवाशाच्या घरातील सर्वांची स्वॅब चाचणी करण्यात आली असता पॉझिटिव्ह प्रवाशाच्या संपर्कातील त्याच्या भावाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

प्रवाशाच्या घरातील भावाचा अहवाल पॉझिटिव्ह 

इंग्लडहून आलेल्या प्रवाशाच्या घरातील भावाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कुटुंबियांची स्वॅब चाचणी करण्यात आली असून, घर सिल करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून, कोरोनाला कुणीही हलक्यात घेऊ नये असे अवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. काही दिवसापासून नांदेड शहरातील मुख्य बाजारपेठेत बहुसंख्य नागरिक विना मास्क व बेजबाबदारपणे फिरताना दिसून येत आहेत.

नागरीक, दुकानदारांचा बेजबाबदारपणा आरोग्य विभागाची चिंता वाढविणार
 
शिवाय अनेक शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली असताना देखील कुठलिही खबरदारी घेतली जात नाही. दुकानदार, व्यावसायीक देखील दुकानात प्रवेश करणाऱ्या ग्राहकांसाठी हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर किंवा हॅन्डवॉश ठेवत नसल्याने ग्राहक देखील तितक्याच बेजबादारपणे बाजारपेठेत खरेदी, व्यवहार करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरीक, दुकानदारांचा हा बेजबाबदारपणा आरोग्य विभागाची चिंता वाढविणारा ठरु शकतो. 

दोन्ही प्रवाशांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेकडे 

इंग्लडहून आलेल्या प्रवाशाची दुसरी चाचणी करण्यात आली आहे. दुसऱ्या चाचणीत त्या प्रवाशाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी, दोन्ही प्रवाशांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आल्याचे डॉ. भोसीकर यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे दोघांचे अहवाल नेमके कसे येणार, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT