file photo 
नांदेड

नांदेडच्या ‘या’ बँकेची निवडणूक पुढे ढकलली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या संबंध जगभरात कोरोना या विषाणूने थमान घातले आहे. त्याचा फटका सर्वत्र बसला असून देशातील उद्योगधंदे व काराखाने बंद पडले आहेत. अनेकांचे रोजगार गेल्याने देशाची आर्थीक स्थिती डघाईस आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना अगोदर तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. आता तर पूर्वीपेक्षा जास्त कोरणा रुग्ण वाढले असल्याने दुसऱ्यांदा पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांची सार्वजनिक निवडणूक तीन महिने पुढे ढकलली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपण्या अगोदर स्थानिक स्तरावर मतदार नोंदणी यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ही प्रक्रिया सुरू असताना राज्य व देशावर कोरोना संक्रमणाचे ढग जमू लागले. त्यामुळे हातातली सर्व कामे सोडून प्रशासन कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनेत लागले आहे. लॉकडाऊनमुळे पहिल्या दोन टप्प्यात सहकारी संस्थांची कार्यालये शटडाऊन करण्यात आली होती. यामुळे या कालावधीत मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांची निवडणूक कशी घ्यावी असा प्रश्न उपस्थित झाला. मग राज्य सरकारने याबाबत घेतलेल्या एका निर्णयाने निर्माण झालेला संभ्रम दूर झाला.

१९६० मधील कलम ७३ मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर

सहकारी संस्थांच्या विद्यमान संस्था संचालक मंडळाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून शासनाने उपरोक्त निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता निवडणूक पुढे ढकलल्याने राजकारण्यांना दिलासा मिळाला आहे. आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला असला तरी संक्रमणाचा धोका वाढला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने मुदत संपणाऱ्या सर्व सहकारी संस्थांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक मंडळाला तीन महिन्यांची मुदतवाढ

ज्या टप्प्यावर निवडणुकीची प्रक्रिया थांबलेली आहे त्याच टप्प्यावर स्थगित ठेवावी असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे नांदेड जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक मंडळाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली असून निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात आली आहेत. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील ज्या सहकारी संस्थांची मुदत संपत आहे अशा सर्व संस्थांच्या निवडणुका ही काही महिने पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT