file Photo 
नांदेड

नांदेडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, २५ अहवाल पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू 

शिवचरण वावळे

नांदेड -जिल्ह्यात बुधवारी (ता. दहा) प्राप्त झालेल्या अहवालात २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर उपचारादरम्यान एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. मात्र, असे असले तरी सद्यस्थितीत जिल्हाभरात २३७ कोरोनाबाधित रुग्णसंख्या असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे दिसून येते. 

मंगळवारी (ता. नऊ) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी बुधवारी (ता. दहा) ६१६ अहवाल प्राप्त झाले. यामधील ५८५ निगेटिव्ह तर २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजार ७२५ इतकी झाली आहे. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या देगलूर येथील पुरुष (वय २२) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५९० कोरोना बाधितव्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ टक्के 

बुधवारी श्री गुरु गोविंदसिंघजी स्‍मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - दोन, महापालिकातंर्गत गृहविलगीकरण कक्षातील - १७, देगलूर - एक, हदगाव - एक व खासगी रुग्णालयातील पाच असे २६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत २१ हजार ६९० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी नांदेड महापालीका क्षेत्रातील २०, देगलूर - एक, कंधार - तीन व माहूर - एक असे २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या २३७ बाधितावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी सात पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ टक्के इतकी आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ३९५ स्वॅबची चाचणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - २२ हजार ७२५ 
एकुण बरे - २१ हजार ६९० 
एकुण मृत्यू - ५९० 
बुधवारी पॉझिटिव्ह - २५ 
बुधवारी बरे - २६ 
बुधवारी मृत्यू - एक 
उपचार सुरु - २३७ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Pune News: थरारक जलक्रीडांनी रंगला ‘रिगाटा महोत्सव’; पुण्यात ९८ वर्षांच्या परंपरेचा जलतिमाही उत्सव, नौकांची धमाल!

Beed News: मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, गावात राजकीय वातावरण तापले

Chhatrapati Sambhajinagar: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अलॉटमेंट जाहीर; नीट एसएस काउन्सिलिंग ; घाटीत सात विषयांत २६ जागांसाठी प्रवेश निश्‍चिती सुरू

Pune Railway Workshop: ‘वंदे भारत’च्या चाकांना पुण्यात मिळणार आकार; लवकरच २१ कोटींची लेथ मशिन दाखल, रेल्वेची चाके सुस्थितीत राहणार!

SCROLL FOR NEXT