file photo 
नांदेड

कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली असून कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून ‘कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान’ राबविण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी दिली. 

सध्या राज्यभर कोरोना महामारीचे संकट घोंगावत आहे. अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. अशा काळात शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाउन जाहीर केला होता. त्याचे परिणाम गेल्या तीन - चार महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहेत. उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. अनेकांच्या हाताला काम उरलेले नाही. अनेक जणांची हलाखीची परिस्थिती झाली आहे. काही ठिकाणी उद्योगधंदे ठप्प झाले आहे. राज्याच्या तिजोरीवर देखील ताण आला आहे. 

शाळा, महाविद्यालये, क्लासेस बंद 
पालक आणि शाळा, महाविद्यालये देखील अपवाद नाहीत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस या महामारीमुळे गेली चार महिने बंद आहेत. बऱ्यापैकी कामकाज कमी झाले आहे किंवा विद्यार्थ्यांचे वर्ग प्रत्यक्षात विद्यालय आवारात भरत नाहीत. परिणामी शाळा, महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारचा अधिकचा खर्च सध्या चालू नाही. उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि वार्षिक अभ्यासक्रमाबाबत कुठलेही नुकसान होऊ नये, म्हणून काही ठिकाणी ऑनलाइन वर्ग चालू केले आहेत. 

पालकांवर आर्थिक संकट
मात्र, काही ठिकाणी शाळा, महाविद्यालये अधिकचे शैक्षणिक शुल्क पालकांकडून जबरदस्तीने घेताना आढळून येत आहेत. तर काही ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांच्याकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावताना दिसत आहेत. अशा वेळेस काही शाळांसोबत व विद्यालयांसोबत संपर्क केला असता त्यांच्याही काही अडचणी आहेत असे जाणून आले. मात्र, पालक वर्गाचे देखील बरेच नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक संकट ओढवले गेले आहे. 

यावर क्लिक करा - खासदार चिखलीकर यांची केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर
  
शुल्क निश्चित धोरण ठरवणे गरजेचे 
कोरोना संसर्गाच्या अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये, क्लासेस यांनी शुल्क निश्चिती आणि विद्यार्थ्यांच्याकडून शुल्क मागणी या बाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मांडली आहे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून येणाऱ्या काळामध्ये ‘कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सूचित केले असल्याची माहिती नांदेडचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी दिली आहे.

सर्व शाळा, महाविद्यालय व क्लासेस देणार भेट 
वरील शुल्कनीती सर्व शाळा, महाविद्यालय व क्लासेस समजावून सांगत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मराठवाडा विभागाचे नवनिर्वाचित विभागीय प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड शहर ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम हे सर्व शाळा, महाविद्यालय व  क्लासेस यांना  प्रत्यक्ष भेट देऊन वरील कोविड शिक्षण शुल्कनीती समजावून सांगणार आहेत. त्याचबरोबर या शिक्षण शुल्कनीती चा अवलंब करण्याचा आग्रह धरणार आहे व तसे न करता विद्यार्थ्यांना वा पालकांना शैक्षणिक संस्थांकडून नाहक त्रास झाल्यास विद्यार्थी काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल अशी माहिती  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी एक पत्रकाद्वारे मांडली.

या आहेत शुल्कनीतीसंदर्भात मागण्या  

  • शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये.
  • शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे.
  • निश्चित केलेले शुल्क टप्प्या टप्प्याने  भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी.
  • कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये. 
  • केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT