Nanded News 
नांदेड

जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष संघटन बांधणीस प्राधान्य देणार जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर

शिवचरण वावळे

नांदेड - अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर मला पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्षपदासाठी संधी दिली आहे. भविष्यात राष्ट्रवादी पक्ष संघटन बांधणीसाठी प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड जिल्हा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच श्री.भोसीकर यांनी हॉटेल अतिथी येथे शुक्रवारी (ता.१८) पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादी मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, कार्याध्यक्ष जिवन घोगरे पाटील, युवक राष्ट्रवादीचे वसंत सुगावे, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, शहराध्यक्ष रऊफ जमिनदार, श्रीकांत मांजरमकर, संतोष दगडगावकर यांची उपस्थिती होती.
 
हेही वाचा- Success Story:नांदेडमध्ये पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची लागवड, डेरला येथील अर्जुन जाधव यांचा यशस्वी प्रयत्न ​

ग्रामपंचायत निवडणूकीनंतर जिल्ह्यातील १६ तालुक्याचा दौरा करणार 

या वेळी जिल्हाध्यक्ष श्री.भोसीकर म्हणाले, जिल्ह्यातील राष्ट्रवादीची घडी नव्याने बसविण्यासाठी जुन्या सहकाऱ्यांसोबतच राष्ट्रवादी पक्षात येऊन कार्य करु इच्छिणाऱ्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायत निवडणूक पार पडताच जिल्ह्यातील १६ तालुक्याचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी योंजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. अनेक वर्षापासून राष्ट्रावादी कॉँग्रेस पक्षात असल्याने आजही नेता नव्हे तर सामान्य कार्यकर्ता म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कार्य करण्यावर भर देणार आहे. पक्ष कार्यकारिणीकडून जी जबाबदारी सोपवली ती जबाबदारी अगदी निष्ठेने पार पाडेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

पक्षाच्या हितासाठी प्रामाणिक कार्यकरणार 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षातील ज्येष्ठ व नवीन सहकारी अवश्‍यक तेव्हा मदतघेऊन पक्षाच्या हितासाठी प्रामाणिक कार्यकरणार असल्याचे भोसिकर म्हणाले.

स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात नाराजी 

या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री.भोसीकर म्हणाले, प्रा.यशपाल भिंगे यांना राष्ट्रपाल नियुक्त आमदार जागेसाठी पक्षाने निवड केल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात नाराजी असल्याचे कबुल करत पक्षश्रेष्ठी राष्‍ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा अंतिम निर्णय असल्याने त्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले..N

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Fake Farmer Card: सिल्लोडमध्ये बनावट ‘फार्मर कार्ड’; योजनेच्या नावाखाली केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

SCROLL FOR NEXT