नांदेड : मराठवाड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी येथे नवीन पोलिस अधीक्षक येणार आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांची सिंधुदुर्गला पोलिस अधीक्षक पदावर बदली झाली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन अशोक पाटील हे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून औरंगाबादला येत आहेत. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी बदल्याचे आदेश काढले आहेत.
नांदेडला पोलिस अधीक्षक म्हणून बृहन्मुंबईचे पोलिस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली झाली आहे. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांची लातूरला पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
हिंगोलीच्या राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक बाराचे समादेशक संदीपसिंह गिल यांची हिंगोली पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. जालन्याच्या राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक तीनच्या समादेशक श्रीमती रागसुधा आर. यांची परभणीच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची गोंदियाच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, हिंगोलीचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर आणि परभणीचे जयंत मीना यांची बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
पिंगळेंची लातूरमध्ये छाप
लातूर : लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची गोंदियाला बदली झाली असून त्यांच्या जागी गडचिरोलीचे अप्पर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे येत आहेत. पिंगळे हे दोन वर्षांपूर्वी येथे रुजू झाले . जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चोखपणे त्यांनी सांभाळली. जिल्ह्यात मोठा जनसंपर्कही त्यांनी तयार केला.
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वारंवार छापे टाकून त्यांनी अवैध धंद्यावर आळा घातला. त्यांच्या काळात जिल्ह्यात घडलेले मोठे व गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना यश आले. त्यांच्या काळात झालेली विविध आंदोलनेही शांततेत पार पडली. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण चांगले राहिल्याने पिंगळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांत पोलिसांबद्दल एक प्रकारे विश्वासाचे वातावरण तयार केले होते.
लातूर महापालिकेच्या आयुक्तपदी मनोहरे
लातूर : नांदेड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची लातूर आयुक्तपदी बदली झाली आहे. येथील आयुक्त अमन मित्तल यांची काही दिवसांपूर्वी जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती.
त्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी . यांच्याकडे लातूर महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार होता. जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी शहराचे प्रश्न सोडवण्यास सुरवातही केली होती. त्यांनी जन सुनावणी उपक्रम सुरू केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.