मुदखेड निवघा खून प्रकरण 
नांदेड

निवघा खून प्रकरणातील सुपारीचा कट उघड; तिघांना अटक, मुख्य मारेकरी मोकाट

आकाश पवार तसेच देविदास पवार एकाच गावातील असल्याने व्याजाच्या पैशाचा देवाण- घेवाणीवरुन त्यांच्यात वाद होता. आकाश पवार यांनी याच गोष्टीचा राग मनात ठेवून देविदास पवार यांच्या खुनाची सुपारी दिली होती.

प्रताप देशमुख

बारड (जिल्हा नांदेड) : मुदखेड तालुक्यातील निवघा गावात (Mudkhed murder) पैशाच्या देवाण- घेवाणीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील सुपारी देऊन कट रचणाऱ्यातिघांना पोलिसांनी अटक केली असून चार दिवसांची पोलिस कोठडी (police custudy) मिळाली आहे. मारेकरी अजूनही फरारच असून पोलिसांनी शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. (Nivagha- murder- case- uncovered- planing- Three arrested-main- killer not arest)

अतिरिक्त पोलिस आयुक्त विजय कबाडे तसेच ग्रामीण पोलिस उपाधीक्षक बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवराज तूगावे यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने तपास चक्र वेगात सुरु होऊन अवघ्या चोवीस तासाच्या आत खुनाची सुपारी देऊन कट रचणार्‍या मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. निवगा गावात (ता. १७) हवेत गोळीबार करुन तलवारीच्या साह्याने देविदास पवार या युवकाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात आकाश पवार, किशन पवार, हनुमंत पल्लेवार या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर त्या तिघांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली असून खून प्रकरणात सुपारी देऊन कट रचल्याची माहिती उघड झाली आहे.

हेही वाचा - लुटेरी दुल्‍हन..विवाह करून पंधराच दिवस नांदायची

आकाश पवार तसेच देविदास पवार एकाच गावातील असल्याने व्याजाच्या पैशाचा देवाण- घेवाणीवरुन त्यांच्यात वाद होता. आकाश पवार यांनी याच गोष्टीचा राग मनात ठेवून देविदास पवार यांच्या खुनाची सुपारी दिली होती. कुणाच्या एक दिवस अगोदर कॅनल रस्त्यावर खुनाचा कट रचण्यात आल्याचे चौकशीत पुढे आले. परंतु देविदास पवार त्या दिवशी सापडला नसल्याने खुनाचा बेत फसला होता. आरोपी आकाश पवार गावातील असल्याने देविदास पवार वर लक्ष ठेवून होता. यानंतर देविदास पवार गावात असल्याची माहिती मारेकरी लकी मोरे (रा. मुदखेड), ज्ञानेश्वर जाधव (रा. माळकौठा ता. मुदखेड), शिवाजी पुयड (रा. पुयडवाडी ता. नांदेड) यांना देण्यात आली. त्यानंतर मारेकऱ्यांनी गावात दुचाकीवरुन प्रवेश करुन हवेत गोळीबार करून देविदास पवार यास गंभीर जखमी केले होते. त्यानंतर मारेकरी दुचाकीवरुन देविदास पवार यास घेऊन पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी देविदास पवार यांचा शोध घेतला असता वाडी मुक्तार (ता. मुदखेड) शिवारात देविदास पवार यांचा मृतदेह आढळून आला होता. परंतु मारेकर्‍यांनी मात्र पळ काढला होता.

पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. खून प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असले तरी कुणाची सुपारी देऊन कट रचणार्‍या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण याचे गूढ उलगडण्यास यश आले होते. या खून प्रकरणात एकूण सहा आरोपी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवराज तुगावे यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. ग्रामीण भागात दिवसा ढवळ्या गुंडागर्दीच्या माध्यमातून खुनाची घटना घडल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. खूनाचा खरा तपास मारेकरी सापडल्या नंतरच पुढे येईल अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

SCROLL FOR NEXT