file photo 
नांदेड

नांदेडला कोरोना रुग्णांचा आकडा चारशेच्याजवळ

अभय कुळकजाईकर

नांदेड - बुधवारी (ता. एक जून) नव्याने १६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून आता रुग्णांची एकूण संख्या ३९१ झाली आहे. आत्तापर्यंत २९२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या ८२ कोरोना बाधित व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर १७ जणांचा इतर आजारासह कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना आजारातून पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील  सात   बाधित व्यक्ती तसेच मुखेड कोविड केअर सेंटर येथील एक आणि औरंगाबाद येथील संदर्भित झालेला एक रुग्ण असे एकुण नऊ बाधित व्यक्ती बुधवारी (ता. एक) बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.  

सोळा नव्याने बाधित
बुधवारी (ता. एक) सायंकाळी पाच  वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण ८७ अहवालांपैकी ५६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात १६ नवीन बाधित व्यक्ती आढळले. या बाधितांमध्ये बाफना परिसरातील २८ व ६४ वर्षाचे दोन पुरुष, आंबेडकरनगर येथील पाच वर्षाची बालिका व ३३ वर्षाचा एक पुरुष, असर्जन येथील चार बाधित व्यक्तींपैकी दहा, ११ व ३७ वर्षाच्या तीन महिला, ४२ वर्षाचा एक पुरुष, विनायकनगर येथील ३४ वर्षाची एक महिला, वसंतनगर येथील ५२ वर्षाची एक महिला, गाडीपुरा येथील ५४ वर्षाची एक महिला,
आनंदनगर परिसरातील ३६ वर्षाची एक महिला, अनिकेतनगर भावसार चौक येथील ६५ वर्षाची एक महिला, कंधार तालुक्यातील सोमला तांडा उमरज येथील ६५ वर्षाची एक महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील २० वर्षाचा एक पुरुष व ३८ वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली आहे.
 
८२ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात ८२   बाधितांपैकी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ३०,  पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४२, देगलूर कोविड केअर सेंटर येथे एक, हदगाव कोविड केअर सेंटर येथे एक तसेच जिल्हा रुग्णालय येथे एक बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर सहा बाधित   औरंगाबाद आणि एक बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. बुधवारी (ता. एक) ८४   व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल गुरूवारी (ता. दोन) सायंकाळपर्यंत प्राप्त होईल.

१३ रुग्णांची प्रकृती गंभीर
उपचार घेत असलेल्या ८२ बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील १३ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. त्यात सात महिला आणि सहा पुरुष यांचा समावेश आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी सहा, मंगळवारी दहा तर बुधवारी ही संख्या १३ झाली आहे.

जिल्ह्याची कोरोनाविषयी संक्षीप्त माहिती 

  • सर्वेक्षण - एक  लाख ४६  हजार ७८७
  • घेतलेले स्वॅब - सहा  हजार ५२२
  • निगेटिव्ह स्वॅब - पाच  हजार ६५२
  • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या - १६
  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - ३९१
  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - नऊ
  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - पाच
  • एकूण मृत्यू संख्या - १७
  • रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या - २९२
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - ८२
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ८४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT