esakal | उस्मानाबाद : बायोमेट्रिक बंधनकारक...धान्य दुकानात असा वाढणार धोका..!
sakal

बोलून बातमी शोधा

bayometric photo.jpg

शासनाने दिलेली मुदत संपल्याने आता लाभार्थ्यांना रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी करूनच धान्य मिळणार आहे. त्यामुळे रेशन दुकानातूनच कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून शासनाने 'अनलॉक टू' ३१ जुलै पर्यत घोषणा केली आहे.

उस्मानाबाद : बायोमेट्रिक बंधनकारक...धान्य दुकानात असा वाढणार धोका..!

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून लाभार्थींची बायोमेट्रिक पडताळणी न करता दुकानदार किंवा नॉमिनी यांचा ई-पॉस मशीनला अंगठा लावून धान्य वाटप करण्याचे निर्देश ३० जूनपर्यंत राज्य शासनाने दिले होते.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

शासनाने दिलेली मुदत संपल्याने आता लाभार्थ्यांना रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी करूनच धान्य मिळणार आहे. त्यामुळे रेशन दुकानातूनच कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून शासनाने 'अनलॉक टू' ३१ जुलै पर्यत घोषणा केली आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने आजाराला प्रतिबंध व नियंत्रण यासाठी तातडीच्या व आपत्कालीन उपाययोजना सुरू आहेत. यात रुग्ण शोध मोहीम, रुग्णांचे विलगीकरण व एकंदरच विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण या बाबीचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून अल्पदरातील व प्रधानमंत्री गरीब कल्याण कुटूंब योजना अंतर्गत मोफत प्रतिसदस्य पाच किलो तांदूळ वितरण केले जात आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्त भाव दुकानदारांनी स्वतःचे आधार (नॉमिनी) अधिप्रमाणित करून ३० जून पर्यत धान्य वाटपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत सदरील सुविधेला राज्य शासनाने मुदतवाढ न दिल्याने यापुढे लाभार्थ्यांना बायोमेट्रिक पडताळणी करूनच (अंगठा लावून) धान्य मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्याना पॉश मशीनवर अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळणार नाही. त्यामुळे रेशन दुकानातूनच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   


सामाजिक अंतराचा उडणार फज्जा

सामाजिक अंतर ठेवणे, तोंडाला मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. त्यामुळे रेशन दुकानातून धान्य वाटप करताना लाभार्थ्यांची पडताळणी केल्याशिवाय धान्य वाटप करता येणार नाही. त्यामुळे सामाजिक अंतराचा प्रश्न उदभवतो परिणामी सामाजिक अंतर ठेवण्याच्या शासकीय नियमांचे उल्लंघन होईल.

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली   

शासनाने मुदतवाढ द्यावी

राज्य शासनाने ३१ जुलै पर्यत अनलॉक टू ची घोषणा केली असून केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण कुटूंब योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यत मोफत धान्य देणार असल्याचे घोषणा केली आहे.त्यामुळे कोरोनाचा धोका समजून शासनाने मुदतवाढ द्यावी अशी मागणी होत आहे.