नांदेड - तहसीलदार किरण अंबेकर यांनी बुधवारी निवडणुक विभागातील टेबलला भेट देऊन पाहणी केली. 
नांदेड

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नांदेड तालुक्यातून दीड हजाराहून अर्ज

अभय कुळकजाईकर

नांदेड - ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. ३०) इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह गर्दी केली होती. विविध गावातील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल केले. नांदेड तालुक्यातील ६५ गावातील निवडणुकीसाठी जवळपास दीड हजाराहून अधिक अर्ज दाखल झाल्याची माहिती नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली. 

नवीन वर्षात ता. १५ जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे अंतिम दिवसाचा मुहुर्त साधून विविध गावातील इच्छुक उमेदवारांनी बुधवारी शक्तीप्रदर्शन केले. अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणचा परिसर गाड्यांनी आणि इच्छुकांच्या गर्दीने फुलून गेला होता. ऑनलाइन अर्ज भरण्यास सर्व्हरमुळे अडचणी येत असल्यामुळे निवडणूक विभागाने ऑफलाइन अर्ज भरण्याला मान्यता दिली. अर्ज भरण्याची महत्वाची अडचण दूर झाल्याने उमेदवारांनी देखील समाधान व्यक्त केले. 

नांदेड तालुक्यात ६५ गावात निवडणुक
नांदेड तालुक्यात ७३ गावे असून त्यापैकी ६५ गावात ग्रामपंचायतीची निवडणुक होत आहे. त्यासाठी बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या सभागृहात प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे इच्छुकांची गर्दी झाली होती. यावेळी तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, उर्मिला कुलकर्णी, सारंग चव्हाण, कुणाल जगताप यांच्यासह निवडणुक निर्णय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार किरण अंबेकर यांनी टेबल क्रमांक आठ येथे भेट दिली. निवडणूक कार्याची पाहणी करुन नवीन काही सुचना देवून कामाचे कौतुक केले. या प्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी शंकर इंगळे, जे. एस. कांबळे आदी उपस्थित होते. 
या निवडणुकीसाठी २६ निवडणुक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार श्री. अंबेकर यांनी दिली. 

चार जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार
बुधवारी उमेदवार आणि त्यांच्या अर्जांची संख्या समजू शकली नाही. जवळपास दीड हजाराहून अधिक अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणुक विभागातर्फे देण्यात आली. गुरूवारी (ता. ३१) अर्जाची छाननी करण्यात येणार असून लगेचच उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर गुरूवारपासून ते ता. चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान, निवडणुकीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी येत्या ता. एक जानेवारी रोजी स्टेडीयम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याची माहिती नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

SCROLL FOR NEXT