गुन्हा 
नांदेड

मोबाईलवर बोलून दोन ज्येष्ठ नागरिकांची सव्वा लाखांची फसवणूक

अभय कुळकजाईकर

नांदेड : मोबाईलवर बोलून (Crime In Nanded) दोन वेगवेगळ्या घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाइन फसवणुक (Online Fraud) केल्याची घटना घडली असून त्यात एक लाख २१ हजार ८९५ रुपये बॅंकेच्या (Bank) खात्यातून काढून घेतले आहेत. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशनगर येथील व्यापारी प्रविण वृंदावन सोनी (वय ५८) यांना शनिवारी (ता. २४) रात्री सात ते आठच्या दरम्यान एका आरोपीने मोबाईलवर एसएमएस पाठवला. त्यानंतर त्या लिंकद्वारे व्यापारी सोनी यांची माहिती घेऊन त्यांच्या गुरूद्वारा भागातील एसबीआय बॅंकेच्या शाखेतील बचत खात्यातून ७१ हजार ८९५ रुपये काढून घेतले. आपली दिशाभूल आणि फसवणुक झाल्याचे कळाल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(online cheating with two senior citizens in nanded glp88)

दुसऱ्या घटनेत यशवंतनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश जिजाभाऊ शिंदे (वय ५८) यांना शुक्रवारी (ता. २३) मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने बीएसएनएल कंपनीतर्फे बोलतो असे सांगून लिंक पाठवली. त्यानंतर त्याच्यावर ओटीपी टाकायला लावला. ही प्रक्रिया झाल्यावर त्याने श्री. शिंदे यांच्या बॅंक खात्यातून पन्नास हजार रुपये काढून घेतले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नरूटे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT