कृषी विद्यापीठाचा खरीप मेळावा.jpg 
नांदेड

परभणी कृषी विद्यापीठाचा खरीप मेळावा होणार ऑनलाइन

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा वर्धापन दिनानिमित्‍त ता. १८ मे रोजी खरीप शेतकरी मेळावा दरवर्षी घेण्यात येतो. परंतु यंदा करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व राज्‍यात लॉकडाऊनच्‍या पार्श्‍वभुमीवर खरिप शेतकरी मेळावा रद्द करुन शेतकऱ्यासमवेत झुम ॲपव्दारे ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रम घेण्‍यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

झुम ॲपव्दारे ऑनलाईन कृषि संवाद 
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा वर्धापन दिन दरवर्षी ता. १८ मे रोजी साजरा होत असतो. या वर्धापण दिनानिमीत्त विद्यापीठाकडून खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात येते. यात कृषी मंत्र्यांसह केंद्र तसेच राज्यातील कृषी विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, अधिकारी, कुलगुरु, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. याच मेळाव्यात शेतकऱ्यांना विद्यापीठाने संशोधीत केलेल्या बियाणांची विक्री होत असते. परंतु यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्‍यात लॉकडाऊन लागू केल्यामुळे पार्श्‍वभुमीवर खरिप शेतकरी मेळावा रद्द करुन शेतकऱ्यासमवेत झुम ॲपव्दारे ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रम घेण्‍यात येणार आहे.
 
हेही वाचा.....Big Breaking : नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह

तुर, मुग, खरीप ज्‍वारीचे बियाणे मिळणार
विद्यापीठामध्ये उत्‍पादीत तुर, मुग व खरीप ज्‍वारी पिकांच्‍या वाणांचे बियाणे खरीप हंगामात पेरणीसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्‍ह्यात शेतकऱ्यांना उपलब्‍ध करण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे. याकरिता मराठवाड्यातील विद्यापीठाच्‍या कार्यक्षेत्रातील जिल्‍ह्यात कार्यरत असलेल्‍या कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे व कृषि महाविद्यालये यांच्‍या माध्‍यमातुन बियाणे विक्रीस जुन महिण्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे.

कृषि विज्ञान केंद्रात बियाणे मिळणार 
याकरिता औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र, हिंगोली येथील गोळेगाव कृषी महाविद्यालय, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्र, लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्र, जालना जिल्ह्यातील बदनापुर येथील कृषि विज्ञान केंद्र, बीड जिल्‍हयातील खामगांव येथील कृषि विज्ञान केंद्र, उस्‍मानाबाद जिल्‍हयातील तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र तसेच परभणी मुख्‍यालयी बीज प्रक्रीया केंद्रात हे बियाणे विक्रीसाठी उपलब्‍ध होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

प्रमाणित बियाणे मिळणार 
तुर पिकाचे बीडीएन-७११ (पांढरा), बीडीएन-७१६ (लाल), बीएसएमआर-७३६ (लाल) या वाणाचे ६ किलो बॅगची किंमत ७८० रूपये. मुगाचे बीएम-२००३-२ या वाणाचे ६ किलो बॅगची ७८० रूपये आहे तर खरीप ज्‍वारीमध्ये परभणी शक्‍ती वाणाची ४ किलो बॅग २४० रूपये किंमतीस उपलब्‍ध होणार आहे, अशी माहिती बीज प्रक्रीया केंद्राच्‍या वतीने देण्‍यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT