file photo 
नांदेड

नांदेड : सचखंड एक्सप्रेसच्या स्वच्छतेविषयी प्रवाशांनी दिले ‘व्हेरी गुड’ग्रेड 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : गाडी संख्या ०२७१५/०२७१६ हुजूर साहिब नांदेड- अमृतसर- हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष एक्सप्रेस ता. १ जून २०२० पासून सुरु आहे. कोविड- १९ च्या प्रभावामुळे भारतभर रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊननंतर नांदेड विभागातून हीच गाडी सर्वप्रथम सुरु करण्यात आली. कोविडच्या कठीण काळातही रेल्वे कर्मचाऱ्यांनी या गाडीत प्रवासी सुविधे / स्वच्छते करिता खूप मेहेनत घेतली आहे. 

आता हळूहळू रेल्वे सेवा पूर्ववत होत आहेत. सचखंड एक्सप्रेस नांदेड विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यापैकी एक महत्वाची गाडी आहे. नुकतेच या गाडीच्या स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे या गाडीच्या स्वच्छतेमध्ये खूप प्रगती झाली आहे. या गाडीमध्ये सर्व टोयलेट हे बायो- टोयलेट आहेत. या  बायो- टोयलेटच्या पूर्ण स्वच्छतेकरिता विशिष्ट्य मशीन- बायोटेंक एवाकुयेषण मशीन वापरण्यात येत आहे. यामुळे बायो- टोयलेटच्या स्वच्छतेमध्ये प्रगती साधता आली आहे. तसेच या गाडीच्या डब्यांची आतून आणि बाहेरून स्वच्छता करण्याकरिता नवीन कंत्राटदाराकडून विशेष केमिकल वापरण्यात येत आहे. यामुळे गाडीची स्वच्छता खूप चांगली होत आहे. 

प्रवासी सुविधेत वाढ करण्याकरिता अगावू मनुष्यबळासोबतच प्रवाशांना लागणाऱ्या वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या करिता विशेष खरेदी करण्यात आली आहे. प्रवास सुरु झाल्यानंतर रेल्वे डब्यामध्ये वारंवार स्वच्छतेकरिता ऑनबोर्ड हावूस कीपिंग (ओ.बी.एच.एस.) ची सुविधा ही पुरवण्यात आली आहे. ओ.बी.एच.एस. कर्मचार्याचे काय कार्य असते हे दर्शवणारे बोर्ड गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये लावण्यात आले आहेत. तसेच जर प्रवासी उपलब्ध सुविधे विषयी / स्वच्छते विषयी समाधानी नसल्यास त्यांनी तक्रार करावयाचा नंबरसुद्धा त्या बोर्डवर छापला आहे. 

तसेच या गाडीमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांकडून फीड बेक फाॅर्म भरुन घेतला जात आहे. या फॉर्ममध्ये बहुतांश प्रवाशी समाधानी आहेत. बहुतांश प्रवाशांनी स्वच्छतेला उत्कृष्ठ तसेच खूप चांगले,व्हेरी गुड असे ग्रेड दिले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalamb News: दुष्काळग्रस्तांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये म्हणून आमदारांना दोरखंडाचा ‘पहारा’!

चिठ्ठी लिहून घेतल्यानंतर किटकनाशक प्यायला भाग पाडलं, इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

SCROLL FOR NEXT