नांदेड

नांदेडमध्ये मंगळवारी एका रुग्णाची भर 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील शाहूनगर परिसरातील एक ४१ वर्षीय पुरुषाचा अहवाल मंगळवारी (ता. नऊ) पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील बाधीतांची संख्या १९३ वर पोचली आहे. तर दुसरीकडे मुखेड कोविड केअर सेंटर येथील दोन बाधित व्यक्ती व पंजाब भवन यात्री निवासातील एक बाधित असे एकूण तीन बाधितांना बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत १९३ बाधितांपैकी १३४ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. उर्वरीत ५० बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार चालू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दोन बाधितांची प्रकृती गंभीर 
मंगळवारी (ता. नऊ) प्राप्त झालेल्या एकूण ३० अहवालांपैकी २९ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १९३ एवढी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या तीन बाधितांपैकी ६५ वर्षे वयाची एक महिला, अनुक्रमे ६५ व ७४ वर्षे वयाच्या दोन बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या नऊ झाली आहे. 

७९ व्यक्तींचे स्वॅब प्रलंबीत
जिल्ह्यात बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ११ बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे ३८, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर येथे एक बाधित व्यक्तीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. मंगळवारी ७९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल बुधवारी (ता. १०) सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील, अशी माहिती देण्यात आली.

वर्तनात बदल करुन घ्यावी सुरक्षितेची काळजी
जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान बारा तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती
सर्वेक्षण - एक लाख ४३ हजार ७२३ 
घेतलेले स्वॅब - चार हजार ५७९ 
निगेटिव्ह स्वॅब - चार हजार ४३ 
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या - एक
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - १९३
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - १७६
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - ८१
मृत्यू संख्या- ९
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - १३४
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - ५०
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची संख्या - ७९ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT