फळपीक विमाधारक.jpg 
नांदेड

फळपीक विमाधारकांना भरपाई द्या....कोण म्हणाले ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रधानमंत्री हवामान आधारित फळ पीकविमा केळी, संत्री, मोसंबी मृग बहार, आंबे बहार या विमाधारक शेतकऱ्यांच्या बागेचे (ता. दहा) मे रोजी अतिवेगवान वाऱ्यामुळे व मागील सहा दिवसांपासून ४५.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असल्यामुळे नुकसान झाले आहे. यात लहान, अर्धापूर, बारड, मुदखेड, मालेगाव, शेवडी, बेटसांगवी, दगडगाव, भनगी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सामुदायिक पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश भारतीय पीकविमा कंपनीच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.

शासन निर्णयानुसार भरपाई देणे बंधनकारक 
लॉकडाउन काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी दिले आहे. प्रधानमंत्री हवामान आधारित पीकविमा योजना नांदेड जिल्ह्यामध्ये राबविली जाते. जिल्ह्यातील लहान, मालेगाव, अर्धापूर, बारड, मुदखेड, कासारखेडा, नांदेड, शेवडी, बेटसांगवी, दगडगाव, लिंबगाव आणि नाळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. या योजनेमध्ये अतिवेगवान वारा व जास्त उष्णता ही जोखीम आहे व शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणे विमा कंपनीला बंधनकारक आहे. 

सहा दिवस अतिउष्ण तापमान
ता. दहा मे रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये लहान, मालेगाव, अर्धापूर, बारड, मुदखेड, कासारखेडा, नांदेड, शेवडी, बेटसावंगी, दगडगाव, लिंबगाव आणि नाळेश्वर परिसरामध्ये अति वेगवान वाऱ्यामुळे फळपिकांचे नुकसान झाले. (ता.२४ ते ३१) मेपर्यंत हे सहा दिवस अतिउष्ण म्हणजे ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदणी झाले. यामुळे या दोन्ही अतिउष्ण व अतिवेगवान वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे कोरोनामुळे सामुदायिक पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन म्हटले आहे.

कंपनीसह केंद्राकडे निवेदन
निवेदन भारतीय पीकविमा कंपनी क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांना दिले आहे. लॉकडाउन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री, भारतीय पीकविमा कंपनी, कृषी आयुक्त पुणे, कृषी सचिव, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रा. शिवाजी मोरे यांनी केली आहे. 

बियाणे, खत ज्यादा दराने विक्री करु नये
नांदेड : जिल्ह्यामध्ये खत व बियाण्याची ज्यादा दराने विक्री करत असतात. असा प्रकार या हंगामात झाला तर शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभीर उभा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खत व बियाणे विक्रेत्यांना तत्काळ सूचना कृषी विभागाने द्याव्या असे निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार यांनी दिले आहे.

कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी
सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. जिल्ह्यातील कृषी केंद्रावर शासकीय नियमानुसार उपलब्ध साठा, भाव फलक दर्शनी ठिकाणी लावावा, असे शासकिय आदेश असताना अनेक खत व बियाणे विक्रेते नियमाचे पालन करत नाहीत. यासोबतच विक्रेत्यांनी केल्यास पक्षाशी गाठ आहे असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार यांनी दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी गूडन्यूज! मुसळधार पावसाने ७ धरणांच्या पाणीसाठा २९ टक्क्यांवर, २४ तासात १२ टक्क्यांची वाढ

Pandharpur Flood: महापूर आला तरी वारी चुकवणार नाही, पंढरपुरात हजारो भाविक अडकले; तरी प्रस्थान सोहळ्यास जाण्याचा निर्धार

Latest Marathi News Update: कळमोडी धरण १०० टक्के भरलं, विसर्गामुळे चासकमानच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ

Girna Dam Water Level : नाशिकमधील दमदार पावसाचा 'गिरणा'ला मोठा दिलासा; धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, जळगावला मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच, पाहा सद्यस्थिती

Gold Rate Today: धाडधाड कोसळला सोन्याचा भाव! सलग चौथ्या दिवशी स्वस्त; आज किती रुपयांना मिळतंय सोनं?

SCROLL FOR NEXT