नांदेड

थकीत किराया तत्काळ भरा, गाळाधारकांना तंबी, कोणाची ती वाचा... 

नवनाथ येवले

नांदेड : जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीमधील व्यवसायीक गाळ्यांचा तब्बल तीन कोटी किराया थकीत आहे. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे २००९ मध्ये व्यवसायिक गाळ्यांचा करार करण्यात आला. मात्र, व्यवसायीकांनी करारातील अटींचे उल्लंघन करत अनेक वर्षाचा किराया थकवला. याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या स्वउपन्नावर होत असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी गाळेधारकांना ता. ३० जून महिनाअखेर पर्यंत थकीत किराया भरण्याची तंबी दिली. 

जिल्हा परिषदेच्या तीन मजली इमारतीमध्ये दर्शनी बाजूचे २१ गाळे १५ व्यावसायिकांना २००९ ते २०१४ या कालावधीसाठी करारनामा पद्धतीने किरायाने दिले. करारनाम्यानुसार गाळाधारकांनी किरायाची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनास अदा करणे आवश्यक होते. पण गाळेधारकांनी किराया भरलाच नाही, या उलट प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार राजकीय वजन वापरुन तब्बल तीन कोटी रुपये किराया थकवला. गाळेधारकांकडील थकीत किरायाची नेमकी वसुली करायची किती, हा प्रश्न निर्माण झाल्याने मागील वर्षी सामान्य प्रशासन आणि बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्यातच कुरघोडी झाली. 

हेही वाचानांदेडची केळी इराणला, ‘या’ कंपनीचा पुढाकार, वाचा
  
सामान्य प्रशासनाचे तत्कालीन उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी थकीत किरायाच्या वसुलीसाठी गाळाधारकांना वारंवार नोटीस बजावल्या. या शिवाय वसुलीसाठी समितीच्या तगाद्यामुळे मधल्या काळात १६ लाख रुपये थकीत किराया वसुल झाला. उर्वरित थकीत रक्कम सोईनुसार भरण्याचे कबुल करत व्यावसायिकांनी वेळ मारुन नेली. मात्र, करारनामामध्ये ठरवून दिलेल्या किरायाची रक्कम सामान्य प्रशासनाकडे अदा करणे, अपेक्षीत असताना गाळाधारकांनी नियमीत किराया भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने किरायाची थकीत रक्कम तीन कोटींवर पोहचली. 

व्यावसायिक गाळ्यांच्या थकीत किरायाचा जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नावर वाईट परिणाम होत असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी रावसाहेब कोलगणे यांच्या उपस्थितीत गाळेधारकांची बैठक बोलावली. 

गाळाधारकांनी थकीत किराया वसुलीबाबत प्रशासनाला जबाबदार धरले. दरम्यान, किराया वसुलीसाठी प्रशासनाने आम्हाला तगादा लावला नाही, त्यामुळे आम्ही किरायाची रक्कम भरली नसल्याचा सावध पावित्रा घेतला. व्यावसायिकांच्या वेळमारू वक्तव्याचा जिल्हा परिषद अध्यक्षा अंबुलगेकर यांनी चांगलाच समाचार घेतला. २०१४ पासून पुढील कालावधीत कसल्याच प्रकारचा करारनामा नसल्याची बाब गंभीर आहे. थकित किरायाचा जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नावर परिणाम होत असून तत्काळ व्याजासह थकित किराया भरण्याची तंबी अध्यक्षा सौ. अंबुलगेकर यांनी गाळाधारकांना दिली. 

येथे क्लिक करा केळी उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट......कुठे ते वाचा
 
२००९ च्या करारनामानुसार २०१४ ते २०२० पर्यंतच्या थकीत किराया रक्कमेचे किमान व्याज माफ करण्याची मागणी अध्यक्षा सौ. आंबुलगेकर यांच्याकडे गाळाधारकांनी केली. दरम्यान, थकीत किराया वसुलीसाठी प्रशासनानेच बागुलबुवा केल्याचा प्रकार बैठकीत समोर आल्याने अध्यक्षा सौ. अंबुलगेकर यांनी गाळाधारकांसह उपस्थितीत अधिकाऱ्यांची चांगलीच झडती घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT