vaibazar.jpg
vaibazar.jpg 
नांदेड

‘पीसीआर’ पथकाचा अजब दुजाभाव

साजीद खान


वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः माहूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाई बाजार येथे (ता.१३) मे रोजी राजकीय पूर्ववैमनस्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्यानंतर परस्परांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात विद्यमान महिला सरपंच विमल राम मडावी यांच्या तक्रारीवरुन माजी उपसरपंच सहीत इतर सात जणांवर मारहाण व विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले, तर माजी सरपंच हुसेन पाडसे यांच्या फिर्यादीवरून आजी उपसरपंचावर अनुसुचित जातीजमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. संपुर्ण तालुका ढवळुन निघालेल्या व पूर्वाग्रह राजकीय हेतूने प्रेरित वाई बाजारच्या या प्रकरणात पोलिसांची निर्णायक भूमिका ही देव दुतासारखी जरी ठरली असेल तरी तपासात मात्र भरपूर पाणी मुरत असल्याची चर्चा सध्या परिसरात होत आहे.

राजकिय वरदहस्त मागे

त्याला कारण असे की, सदर घटनेत राजकिय वरदहस्त मागे राहीले नसल्याचे प्रत्यय येत आहेत. उपविभागिय पोलिस आधिकारी विजय जाधव हे घटनेची सखोल चौकशी उत्तमरित्या करत आहेत. परंतु सोमवारी (ता.१८) रोजी नांदेड वरून आलेल्या अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणाच्या चौकशीसाठी पिसिआर पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी सत्ताधारी विद्यमान महिला सरपंचाने नोंदविलेल्या प्रकरणात जाब जवाब नोंदवने व साक्ष, पुरावे इत्यादीच्या सखोल माहितीसाठी माहूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय येथे रखरखत्या उन्हात पाचारण करण्यात आले.

मात्र विरोधी गटाच्या फिर्यादीचे जाब जबाब व साक्ष मात्र या समितीने वाई बाजार येथील एका प्रसिद्ध व राजकीय दृष्ट्या सदैव चर्चेत राहणाऱ्या बार मधील वातानुकूलित कक्षामध्ये नोंदविल्याने गावात एकच चर्चेला उधाण आले आहे. वाई बाजार ग्रामपंचायत प्रकरणात पोलिसांचे कौतुक होत असताना पीसीआर पथकाने बारमध्ये येऊन प्रकरणाचा सोक्षमोक्ष केल्याने या प्रकरणाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेत जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी लक्ष देण्याची नितांत गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.


वाई बाजार प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात मुख्य आरोपीला अटक करण्याच्या हेतूने वाई बाजार येथे गेलो असता सदर आरोपी फरार असल्याचे समजले. त्याच वेळी या प्रकरणातील दुसरे फिर्यादी हुसेन पाडसे बार व रेस्टॉरंटवर उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडून या प्रकरणाची सत्यता पडताळणी करण्यात आली.
- साई प्रकाश चन्ना, सहाय्यक पोलिस निरीक्षक, ‘पीसीआर’ पथक, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT