file photo 
नांदेड

ॲटोसाठी विवाहित महिलेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

ॲटोसाठी विवाहितेचा छळ
नांदेड : शहरातील विमानतळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अहिल्याबाई होळकर चौक, गोविंदनगर नांदेड येथे आरोपींनी संगनमत करून २३ वर्षीय फिर्यादी महिलेस सन २०१८ ते ता. एक जानेवारी २०१९ या दरम्यान ॲटो घेण्यासाठी माहेरुन एंशी हजार रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक तसेच मानसिक छळ केला. तसेच उपाशी ठेवून थापड- बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस जमादार श्री. पांचाळ करीत आहेत.

पाईपलाईन जोडणीच्या कारणावरून मारहाण
मुखेड तालुक्यातील जांब बुद्रुक येथील रामदास वैजनाथ मोरे यांच्या शेतामध्ये पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असताना आरोपींनी कुऱ्हाड तसेच काठीने डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली. तसेच त्यांच्या पत्नीचा हात मोडला. यानंतर शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी (ता. तीन) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामदास मोरे यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार इटूबोने हे करीत आहेत. 

चाकूने मारून जखमी केले
नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथे पद्मावती वडजे या महिलेस व त्यांच्या पतीस माझे लग्न करा, नवीन घर बांधून द्या म्हणुन एकाने वाद घातला. यामुळे पद्मावती वडजे या पतीसमेवत माहेरी जाण्यासाठी बॅग घेऊन निघाल्या असता आरोपीने कुठे निघून चालले म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने पाटीत तसेच छातीत डाव्या बाजूवर चाकूने मारले. यावेळी फिर्यादी महिलेचा पती वाद सोडविण्यासज्ञठी आला असता त्यास चाकून मारून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. तीन) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पद्मावती संदीप वडजे या महिलेच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री पाटेकर करीत आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलले
मुदखेड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बॅंकेमध्ये आरोपींनी संगनमत करून २०१७ ते ता. सहा मे २०२० या दरम्यान साक्षीदार व फिर्यादी यांचे बनावट कागदपत्रे वापरून बनावट सह्या केल्या. यातून संगनमताने कर्ज मंजूर केले. यामुळे फिर्यादी व बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी बँक कर्मचारी दिन पिता से दुनिया यांच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT