Pratap Patil Chikhalikar esakal
नांदेड

जनतेला त्रास होऊ नये म्हणूनच शिंदे, फडणवीसांचे सरकार आले : चिखलीकर

जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास झाल्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार घरी बसले आहे.

अभय कुळकजाईकर

नांदेड : गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमुळे जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास झाल्यामुळेच आघाडीचे सरकार घरी बसले आहे. त्याचबरोबर जनतेला त्रास होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना कोणी गावबंदीचा इशारा देत असेल तर नांदेडमध्ये गावबंदी करण्यासाठी कोणी जन्मलेला नाही. भाजप आणि खासदार या नात्याने मी त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी रविवारी (ता. तीन) व्यक्त केला. (Pratap Patil Chikhalikar Says Shind And Fadnavis Government For Serving People)

राज्यात शिंदे - फडणवीस यांचे सरकार आल्याबद्दल भाजपच्या (BJP) वतीने खासदार चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली. त्यानंतर ‘साई सुभाष’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, प्रविण पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे चिखलीकर, किशोर देशमुख, विजय गंभीरे, बाळू खोमणे, प्रवक्ते प्रल्हाद उमाटे आदी उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात भाजपचे चार आणि शिंदे गटाचे एक असे पाच आमदार असून त्यापैकी मंत्रीपदाची संधी द्यावी तसेच भाजपचा पालकमंत्री असावा, अशीही मागणी त्यांनी केली.

अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा

नांदेड महापालिकेची निवडणुक तोंडावर असून कॉँग्रेसने खड्डे खोदणे व रस्ते करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे हे रस्ते खरोखरच गरजेचे होते का? याचीही तपासणी करावी लागेल. गेल्या ५० वर्षात त्यांच्या घरात सत्ता असूनही विकास झाला नाही, हे खेदाने नमूद करावे लागेल. गेल्या अडीच वर्षात सत्ता असूनही काहीच केले नाही, असा टोलाही त्यांनी मंत्री आणि पालकमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी लगावला.

फडणवीस महाराष्ट्राचे नेते

देवेंद्र फडणवीस हे कुण्या एका समाजाचे नेते नाहीत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. गेल्या अडीच वर्षात त्यांनी भाजपचे १०६ आणि इतर आमदारांना एकत्र ठेवले. माझ्या आयुष्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती पाहिली नाही. सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का होता. पक्ष जो आदेश देईल, ते मान्य करणारे आम्ही आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT