soyabean.jpg
soyabean.jpg 
नांदेड

सोयाबीन, कपाशीसाठी अशी करा हंगामपूर्व तयारी 

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कृषी विभाग नांदेड, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच नांदेड कापूस संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्व करावयाच्या उपाययोजना बाबत दिली माहिती.

कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, शेतकरी उपस्थित
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ४) झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रविण फडणीस, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. खीजर बेग, कृषी उपसंचालक डॉ. दिगंबर पेरके, उपविभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, आर.टी सुखदेव, कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, प्रगतशील शेतकरी आनंदा तिडके, रामराव पवार यांची उपस्थिती होती.

कापूस, सोयाबीन पिकासाठी करावयाची पूर्वतयारी
उन्हाळी नांगरणीची कामे लवकर पूर्ण करावे. मे महिन्यात वखराच्या पाळ्या देऊन जमीन तयार करावी. कापसावर पुन्हा कापसाची लागवड करू नये. पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यात येऊ नये. कापूस पिकाची लागवड जून महिन्यात करावी. पूर्वमशागतीच्या वेळी कापूस पिकांचे मागील हंगामातील सर्व अवशेष पऱ्हाटी, नख्या इत्यादी नष्ट करावेत. बांधावर साठवून ठेवलेल्या कापसाच्या पऱ्हाट्याही जाळून नष्ट कराव्यात.

नोंदणीकृत कृषी केंद्रातच बियाणे घ्यावे
निंबोळी अर्काचा वापर फवारणीसाठी करण्याकरिता परिसरातील लिंबाच्या झाडाखाली पडलेल्या लिंबोळ्या गोळा करून वाळवून ठेवाव्यात. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्याची खरेदी करताना नोंदणीकृत कृषी सेवा केंद्राकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणी खरेदीची सर्व तपशिलासह पक्की पावती घ्यावी. कापूस पिकासाठी एखाद्या विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये.
 
पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी
आपल्याकडे असलेली जमिनीची प्रत, सिंचन सुविधा, लागवड पद्धती, याचा विचार करून वाणाची निवड करावी. अनाधिकृत बियाणे खरेदी करू नये. कापूस, सोयाबीन बियाण्याला जैविक बुरशीनाशके व जैविक खतांची पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. शाश्वत उत्पादनासाठी कापसात मूग, उडीद, सोयाबीन, तूर या आंतरपिकांची पेरणी करावी. रासायनिक खतांची पहिली मात्रा लागवडीपूर्वी अथवा लागवडीच्या वेळी द्यावी. ठिबकद्वारे रासायनिक खतांची मात्रा व्हेंचुरी द्वारे द्यावी. मजुरांची कमतरता असल्यास शिफारस केलेल्या तणनाशकांचा गरजेनुसार उगवणीपुर्वी, उगवणीनंतर वापर करावा. 

उगवण क्षमता तपासून घरचे सोयाबीन पेरावे 
जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. या पिकाच्या पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावे हे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासणी करावी. उगवन शक्तीची टक्केवारी पाहून पेरणीसाठी बियाण्याची मात्रा ठरवावी, व त्यानुसार पेरणी करावी. पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्यास रासायनिक व जैविक औषधांची बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकाची लागवड रुंद सरी वरंबा पद्धतीने करावी या पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. सोयाबीन पिकाची उतारास आडवी पेरणी करावी. सोयाबीन पिकासाठी शिफारस केलेल्या खत मात्रेसह एकरी चार किलो गंधक खताचा वापर करावा. मागील वर्षी सोयाबीन पेरणी केलेल्या क्षेत्रात यावर्षी परत सोयाबीन पिकाची लागवड करू नये. पिकांची फेरपालट करावी.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT