दुधाळ जनावरे. Sakal
नांदेड

नांदेड : दुधाळ पशुधनाचा भाव वधारणार

शेतकऱ्यांचा होणार फायदा; गायीला ६० तर म्हशीला ७० हजारांचे मिळणार अनुदान

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - दुधाळ जनावरांच्या वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजनेमध्ये गाय आणि म्हैस या दोन पशुधनाचे अनुदान वाढण्याचा प्रस्ताव तयार झाला असून, गायीला ६० हजार तर म्हशीला ७० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचा पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे सध्या मान्यतेसाठी आहे. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीसमोर हा प्रस्ताव मान्यतेसाठी येणार आहे. या निर्णयामुळे दुधाळ पशुधनाचा सरकारी दरबारी भाव वधारणार आहे, याचा शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल.

राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी विविध विभागांच्या योजना राज्य सरकारकडून राबवल्या जात आहेत. यामध्ये शेळी, मेंढी यासारख्या छोट्या जनावरांपासून ते गाय, म्हैस यासारख्या मोठ्या जनावरांचा समावेश आहे. पशुपालन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांच्या वतीने दुधाळ जनावरांची वैयक्तिक लाभार्थी योजना राबवली जात आहे. यामध्ये गाय, म्हैस या दोन पशुसाठी लाभार्थ्यांना आर्थिक मदत पशुपालन व दुग्धविकास विभागाकडून केली जाते. एका योजनेचा लाभ घेताना जास्तीत जास्त दोन गायी अथवा दोन म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदानाच्या रुपात लाभार्थ्यांना मिळते.

या योजनेसाठी लाभार्थी आॅनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची पूर्तता झाल्यानंतर अनुदानास पात्र ठरलेल्या पशुधनाच्या ठरलेल्या किंमतीएवढी रक्कम लाभार्थ्यांना मिळते. सध्या या योजनेत गाय व म्हैस यासाठी प्रत्येकी चाळीस हजार रुपये इतके अनुदान मिळते. २०११ मध्ये अनुदानाची ही रक्कम निश्चित केली होती. या दहा वर्षात भाववाढ झाल्याने पशुधनाच्या किंमती वाढलेल्या आहेत. अनुदानाची रक्कम आणि बाजारभाव यामध्ये तफावत असल्याने खरेदी करताना लाभार्थ्यांना पदरचे पैसे घालावे लागत आहेत. ही बाब विचारात घेऊन पशुपालन व दुग्धविकास विभागाने गायीसाठी २० हजाराने वाढ करून ६० हजार तर म्हशींसाठी ३० हजार रुपयांची वाढ करून ७० हजार रुपये इतकी खरेदी किंमत ठरवली. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. यापूर्वी शेळी पालन योजनेतील शेळी खरेदीचे दर वाढलेले आहेत. दुधाळ पशुधनाच्या खरेदी दराचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या प्रतिक्षेत आहे. लवकरच कुक्कुटपालन योजनेतील कोंबडी खरेदीचे दरही वाढवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी माहिती दिली.

पशु सध्याचे दर प्रस्तावित दर

गाय ४० हजार ६० हजार

म्हैस ४० हजार ७० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Elections : निवडणुकीआधीच वंचितने काँग्रेसचा गेम कसा केला? जागा आहेत, पण उमेदवार नाहीत… आता काय?

Viral Video: हत्तीचा ‘परफेक्ट हेअर फ्लिप’ क्षण कॅमेऱ्यात कैद! व्हिडिओ पाहून हसून लोटपोट व्हाल

Nashik Municipal Election : नाशिक भाजपमध्ये 'एबी' फॉर्मचा राडा; विल्होळीत कार्यकर्त्यांचा उद्रेक, तोडफोड आणि पाठलाग!

चक्क पाण्यावर चालणार सायकल! 'इंजिनिअर अरविंद देठेंचा नाविन्यपूर्ण उपक्रम, सायकल चालवून वेगळाच आनंद लुटता येणार..

Latest Marathi News Update : नागपुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं निधन

SCROLL FOR NEXT