file photo 
नांदेड

कैद्याकडील मोबाईल प्रकरण : तुरुंग अधीक्षक नियंत्रण कक्षात, नांदेड कारागृहाची धूरा सोनुने यांच्यावर 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील तुरुंगातील कैद्याकडे सापडलेल्या मोबाईलमुळे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) यांनी कारागृह अधीक्षकांवर कारवाई करुन त्यांची रवानगी नियंत्रण कक्ष पूणे येथे केले आहे. त्यांना हर्सुल कारागृह औरंगाबाद येथे हजेरी देण्याची शिक्षाही देण्यात आली आहे. 

नांदेड तुरुंगात असलेल्या कैद्यांकडे मोबाईल सापडल्यानंतर तुरुंग प्रशासनाच्या वतीने दिलेल्या वजिराबाद पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तुरुंगातील कर्मचारी सय्यद अली शेर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ता. २६ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास नांदेडच्या तुरुंगातील बॅरेक क्रमांक तीनमध्ये दिनेश बालाजी परसे आणि परमजीतसिंग हे दोघे आपल्याकडील मोबाईलवरुन बाहेरच्या लोकांना बोलताना सापडले.

कैद्यांकडून मोबाईल जप्त करुन दिलेल्या फिर्यादीनुसार वजिराबाद पोलिसांनी कट रचणे यासोबत भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ आणि १२० अधिनियम ४२ आणि ४५ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वजिराबाद पोलिस करत होते. तुरुंगात बंद्यांना मोबाईल वापरण्यासाठी बंदी असताना त्यांच्याकडे मोबाईल कसा आला हा एक मोठा विषय असून त्याचाही शोध सुरु आहे. घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल कारागृह प्रशासनाने घेतली. याचा फटका येथील कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांना बसला. त्यांच्यावर कारवाई करत त्यांची रवानगी नियंत्रण कक्ष पूणे येथे बोलावून घेतले. सध्या नांदेड कारागृहाची धूरा सध्या पोलिस उपाधीक्षक दर्जाचे श्री. सोनुने यांच्यावर टाकण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT