नांदेड : येथील श्री गुरुजी रुग्णालयात एका रुग्णाच्या दुर्मिळ अश्या बेंबीच्यावरचा हर्निया व त्यात लहान आतडी काळी पडलेल्या भागावर डॉ.अमोल चवरे यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रीया पार पडली.
शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. दरम्यान त्रास सहन होत नसल्याने (ता.२६) मे रोजी त्यांना छत्रपती चौकातील श्रीगुरुजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉ.चवरे यांनी त्यांना सोनोग्राफी, एक्स-रे रक्त, लघवी अशा विविध तपासणी करण्याचा सल्ला दिला. तेव्हा सोनोग्राफीनंतर त्या रुग्णास बेंबीच्यावर हर्निया होऊन पोटातील लहान आतडी काळी पडल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याच्यावर तातडीने लॅपरोटोमी करणे गरजेचे होते.
दुखणे अंगावर काढल्याने आजार गंभीर झाला
बहुतेकवेळी एखाद्या व्यक्तीस हर्निया आजार झाल्याचे निदान होताच अनेकजण त्यावर शस्त्रक्रीया करुन घेण्यासाठी पुढे येतात. वरील रुग्णाने देखील हर्नियाचे निदान स्पष्ट होऊन आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला देऊन पैसे नसल्याने दुखणे अंगावर काढुन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोटातील आतडी काळी पडण्यास सुरुवात झाली होती.
नातेवाईकांनी डॉक्टरांचे मनाले आभार
परंतु, त्या व्यक्तीस नातेवाईकांनी श्री गुरुजी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सर्जन डॉ. अमोल चवरे यांनी अतिशय कमी वेळ असल्याने व पैशाची चिंता न करता रुग्णाचा जीव वाचवण्यास प्राथमिकता देत त्याच्या विविध तपासणी करुन घेतल्या. तेव्हा बेंबीच्यावर हर्निया व त्यात लहान आतडी काळी पडत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर डॉ.अमोल चवरे आणि भुलतज्ज्ञ डॉ. बोकारे यांच्या टिमने इमरजन्सी ‘लॅपरोटोमी’ केली व पोटातील काळी पडत असलेली लहान आतड्यांना काढून त्या ठिकाणी नवीन जोड देण्याची सर्जरी केली. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रीया सुरु होती. शस्त्रक्रीया यशस्वी झाल्यानंतर शुक्रवारी (ता.चार) या रुग्णास घरी सोडण्यात आले. त्यानंतर त्या रुग्णासह नातेवाईकांनी डॉक्टरांचे मनापासून आभार मानत धन्यवाद दिले.
परिवाराची अडचण लक्षात आली तेव्हा सर्जरीस प्राथमिकता दिली.
यापूर्वी देखील त्यांना हर्नियावर सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, त्याने हा आजार अंगावर काढला होता. आजार इतका गंभीर होण्यापूर्वीच ९९ टक्के रुग्ण आॅपरेशन करुन घेतात. परंतु, या रुग्णाकडे पुरेशे पैसे नसल्याने अनेक महिण्यापासून तो दुखणे अंगावर काढत होता. आम्हाला त्यांची व परिवाराची अडचण लक्षात आली तेव्हा माणूस वाचला पाहिजे, या हेतुने त्याच्यावर सर्जरी करण्यास प्राथमिकता दिली.
-डॉ. अमोल चवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.