Collector Dr.Vipin_.JPG 
नांदेड

कोरोना प्रतिबंधासाठी मनाई आदेश ३१ पर्यंत लागू  

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश रविवार ता. ३१ मे पर्यंत लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात लागू
राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून लॉकडाऊनचा कालावधी रविवार ३१ मे पर्यंत वाढविला आहे. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्ह्यात मनाई आदेश ता. १४ मे ते ता. ३१ मे रोजी मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात नमूद जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश, शुद्धीपत्रक, सुधारीत आदेशानुसार निर्गत निर्दश, अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुद्ध कारवाइ
या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी यांनी नमूद नियमांची अंमलबजावणी, काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोणातून करावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.

साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
सर्व संबंधीत यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच नमूद आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश रविवारी (ता. १७)  जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत.

नवीन वाहनाची नोंदणी वितरकाच्या आवारात
प्रादेशिक परिवहन कार्यालयात फक्त नवीन वाहन नोंदणीचे व खटला विभागातील शासकीय दंड व कर स्विकारण्याचे कामकाज सुरु राहील. नवीन नोंदणीचे कामकाज हे वाहन वितरकाच्या आवारात होणार असल्याने वाहनधारकांनी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरु
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यास्तव प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश ता. १७ मे अन्वये प्रादेशिक परिवहन कार्यालयात दहा टक्के लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालय सोमवारी (ता. १८) पासून सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note Update: RBI कडून 2 अब्ज प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात! केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती; कागदी नोटा बंद होणार?

सलग ५ निर्धाव षटकं अन् ५ विकेट्स; Justin Greaves इतिहास घडवला, पाकिस्तानने गुडघे टेकले; ७ फलंदाज ३८ धावांत तंबूत Video

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

Commonwealth Games: कारगिल योद्ध्यांना विजय समर्पित... पाकिस्तानी बॉक्सरचा धुव्वा उडविल्यानंतर भारताच्या जादुमानीची भावना

Shalarth ID Scam : 841 बोगस शिक्षक अन् 160 कोटींची फसवणूक! शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा गळाला; भाजप नेत्याच्या अटकेने खळबळ, संस्थाचालकाच्या फलटणमधून आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT