नांदेड - सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर शुक्रवारी नांदेड महापालिकेच्या पथकाने कारवाई करण्यास सुरूवात केली.  
नांदेड

नांदेडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू ; ३११ जणांवर कारवाई

अभय कुळकजाईकर

नांदेड - सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्यास नांदेड महापालिकेने शुक्रवारपासून (ता. १८) सुरूवात केली असून विना मास्क फिरणाऱ्या ३११ जणांवर कारवाई करत ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
 
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत पथक तयार करून कारवाई करण्यात सुरूवात केली आहे. 

३११ जणांकडून ३० हजाराचा दंड वसूल
तरोडा सांगवीचे सहायक आयुक्त संजय जाधव, अशोकनगरचे सहायक आयुक्त डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, स्वच्छता निरीक्षक श्री. कल्याणकर, श्री. मुदीराज, श्री. गायकवाड, नईम शेख, श्री. वाघमारे, श्री रोडे यांच्या पथकाने कारवाई केली. शुक्रवारी दिवसभरात विना मास्क फिरणाऱ्या ३११ जणांवर कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर श्रीनगर भागातील काही व्यापारी आणि दुकानदारांची भेट घेऊन दुकानामध्ये मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

नियमांचे तंतोतंत पालन करा
नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे तसेच मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सॅनीटायझरचा वापर करावा. कोरोना संदर्भातील नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधितांविरूद्ध दंडात्मक व आस्थापना बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड जिल्ह्यात ता. १८ फेब्रुवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते ता. चार मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम अन्वये जिल्ह्यात ता. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सहापासून ते ता. चार मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT