trains are on track sakal
नांदेड

नांदेड : रेल्वेच्या सवलती अजूनही वेटिंगवरच

प्रवाशांच्या खिशाला कात्रीच : मासिक पास सुरू करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बहुतांश रेल्वेगाड्या रुळावर आल्या. परंतु, प्रवासी सेवा देताना दिल्या जाणाऱ्या सवलती या वेटिंगवरच ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वरत तिकीटदर आणि मासिक पासची सुविधा अजूनही देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्रीच लागत आहे. रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.हैदराबाद ते नांदेड, औरंगाबाद ते नांदेड, आदिलाबाद आदी मार्गावरील हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. परंतु, दिवसभरातून धावणाऱ्या एक्सप्रेस लहान स्थानकावर थांबत नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गळचेपी होत आहे.(Most trains are on track after the outbreak of the corona virus )

गेल्या दीड वर्षात रेल्वे विभागाच्या वतीने विशेष रेल्वेच्या नावाने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लावण्यात आली. सामान्य दरापेक्षा किमान पन्नास रुपये अधिकचे घेऊन विशेष रेल्वे या नावाने कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकडून पैसे उकळले. या उलट ज्या सवलती सामान्य प्रवाशांना द्यायला हव्या होत्या, त्या दिल्याच नाहीत. उलट सर्वांनाच समान तिकीट आकारणी करण्यात आली. आता मात्र रेल्वेचा विशेष दर्जा काढून सर्व एक्सप्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, पॅसेजर रेल्वेंना अद्यापही वेटींगवरच ठेवण्यात आले आहे.(Passenger trains are still waiting)

पूर्ववत तिकीटदर सुरू करावेत

आजही रेल्वे प्रवाशांना आरक्षित तिकिटांची खरेदी करावीच लागत आहे. कोरोनामुळे आधीच रेल्वे बंद होत्या. त्यातच विशेष रेल्वे सुरु झाल्या. आता रेल्वे पूर्वीप्रमाणे सेवा देणार असल्याचे सांगण्यात येत असताना अद्यापही एक्सप्रेसमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करणे शक्य नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन प्रवाशांना सोयीचे होईल, असे पूर्ववत तिकीटदर आणि मासिक पासची सुविधा सुरु करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

तारिणी केदारला मनातल्या भावना सांगणार, प्रेमाची कबुली देताच मोठा अनर्थ घडणार, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

IPL Schedule Change: IPL च्या सामन्यांमध्ये होणार मोठी वाढ! पण कधीपासून? अरुण धुमल यांनी जाहीर केलं वर्ष!

Enforcement Directorate: EDची ताकद वाढणार! १२०० पेक्षा जास्त पदांवर होणार भरती, जागांमध्ये मोठी वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT