शिवणी (जि.नांदेड) : किनवट तालुक्यातील शिवणीसह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह अर्धातास पाऊस झाला. 
नांदेड

किनवटच्या शिवणी परिसरात पावसाची हजेरी, सोयाबीन संकटात!

विठ्ठल लिंगपुजे

शिवणी (जि.नांदेड) : किनवट (Kinwat) तालुक्यातील शिवणीसह परिसरात सोमवारी (ता.20) दुपारी दीड वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह अर्धातास पाऊस (Rain) झाला. यामुळे कापणीला आलेल्या सोयाबीनचे (Nanded) नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या मनातील धाकधुक वाढली आहे. गेल्या दहा दिवसांच्या पावसाच्या उघडीपीमुळे शिवणी व परिसरातील शेतजमिनीतले सोयाबीन पिके (Soybean) पिवळे पडली. सोयाबीनचे पाने झडु लागल्याने काढणीला आलेले उरले- सुरलेले पिक तरी घरात येईल, या आशेवर असलेल्या बळीराजाच्या मेहनतीवर पाणी फेरते की काय असे वाटायला लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी सोयाबीन कापणीची तयारीला लागला होता. कापणी केल्यावर शेतात गंजी लावुन त्यावर पावसापासुन बचाव करण्यासाठी हातात पैसा नसतानाही उसनवारीवर ताडपत्री खरेदी करावी लागली.

कडक उन्हामुळे शिवणी व परिसरातील काही शेतकरी सोयाबीन कापणीला सुरुवातही केली आहे. एक बॅग सोयाबिन कापणीसाठी अडीच हजार ते तीन हजार रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT