Nanded Rain sakal
नांदेड

Nanded Rain : नांदेडसह काही तालुक्यांत पावसाची हजेरी

नांदेड शहर आणि उमरी, नायगाव, देगलूर, तालुक्यात रविवारी (ता. २३) पावसाने हजेरी लावली. काही भागांत मध्यम ते जोरदार, तर काही भागांत पावसाने शिडकावा केला. यामुळे तापमानात थोडीशी घट झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे काही भागांत पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड शहर आणि उमरी, नायगाव, देगलूर, तालुक्यात रविवारी (ता. २३) पावसाने हजेरी लावली. काही भागांत मध्यम ते जोरदार, तर काही भागांत पावसाने शिडकावा केला. यामुळे तापमानात थोडीशी घट झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे काही भागांत पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यातील अनेक शेतकरी यंदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे चिंताग्रस्त होते. पिकांची वाढ आणि जमिनीचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी पावसाची आवश्यकता होती.

सध्याच्या पावसामुळे पिकांना थोडासा आधार मिळू शकतो आणि जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होईल. शहरातील रहिवाशांमध्येही पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे. उन्हाच्या तडाख्यातून काहीसा आराम मिळाल्यामुळे नागरिक सुखावले आहेत; तसेच शहरातील काही भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याचेही चित्र दिसत आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असली, तरीही नागरिक पावसाचा आनंद घेत आहेत. पुढील काही दिवसांतही अशाच प्रकारचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या या सरींमुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला असून, दमदार पावसाची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत.

किनवट परिसरात धुवाधार पाऊस

किनवट : पावसाने दडी मारल्याने व वाढत्या तापमानाच्या उकाड्याने नागरिकांना उकाडा असह्य होत होत असताना रविवारी (ता.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास शहर परिसरात धुवाधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आठवडी बाजारात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान या पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. जोरदार पावसामुळे नाल्या तुडूंब भरून वाहू लागल्या.

मॉन्सूनपूर्व सफाईकरूनही गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ते जलमय झाले होते. नागरिकांसह वाहनधारकांना पावसाच्या पाण्यातून रस्ता काढण्यासाठी कसरत करावी लागली. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. समाधानकारक पावसामुळे बळीराजाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

Datta Temple : मंदिरातून दत्त मूर्ती चोरीला, सायरन वाजला अन्; लोडेड पिस्तूल चोरट्यांनी..., थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT