dhrmabad mangal karyalay.JPG 
नांदेड

अनधिकृत मंगल कार्यालयावर पालिकेचा हातोडा चालणार का?

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड) ः शहरात बांधकाम परवानगी नसलेले तसेच आरक्षित जागांमध्येही मंगल कार्यालयाचे बांधकामे झाली आहेत. ही अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई पूर्णपणे थंडावली होती. कारवाई करण्यास पालिकेने टाळाटाळ केली आहे. या मुळे सदरील बांधकामे पाडण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागल्याने गंगासीटी येथील आरक्षित जागेवरील मंगल कार्यालय बांधकामप्रकरणी पुन्हा कारवाई सुरू होणार असल्याचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले आहे. पालिकेच्या कारवाईचा हातोडा खरोखरच चालणार की ‘वरून’ दबाव आल्यानंतर कारवाईला ब्रेक लागणार याकडे धर्माबादवासीयांचे लक्ष लागले आहे.


कार्यालयाला नेमका आशीर्वाद कुणाचा?
मंगल कार्यालयाची किंवा बांधकामाची कोणतीही परवानगी नगरपालिकेकडून न घेता आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात गंगासीटी येथील उच्चभ्रू वस्तीत व्यावसायिक मंगल कार्यालयाचे बांधकाम करून प्रशासनाची खिल्ली उडवली. हे मंगल कार्यालय पाडण्यात यावे, अशी मागणी तीन महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याकडे करण्यात आली होती. सदरील मंगल कार्यालय पाडण्याचा ठराव नगर पालिकेच्या २० सन्माननीय सदस्यांनी घेतला होता. गंगासीटी येथील मंगल कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने पत्राद्वारे धडक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. परंतु ही कारवाई गुलदस्त्यात राहिली आहे. अशातच कोरोना संसर्ग महामारीने देशात थैमान घातले आहे. त्यामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी मंगेश देवरे व पालिकेचे कर्मचारी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दोन अडीच महिने व्यस्त होते. या मुळे मंगल कार्यालय पाडण्याची कारवाई थंडावली होती. मंगल कार्यालय पाडण्याचा ठराव घेऊन सहा महिने उलटले तरी अद्याप सदरील मंगल कार्यालय पाडण्यात आले नसल्यामुळे या मंगल कार्यालयाला नेमका आशीर्वाद कुणाचा? हा प्रश्न उपस्थित होत आहे.


कारवाईला ब्रेक लागणार 
आता हळूहळू बाजारपेठ सुरू झाली असून मंगल कार्यालय पाडण्याची मागणी मुख्याधिकारी देवरे यांच्याकडे पुन्हा जोर धरू लागली आहे. यामुळे आरक्षित जागेवरील मंगल कार्यालय बांधकामप्रकरणी पुन्हा कारवाई सुरू होणार असल्याचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे बांधकामधारकाचे धाबे दणाणले असून अनेक धनदांडगे राजकीय लोकांकडे ‘वाऱ्या’ सुरू केल्या आहेत. त्यामुळे मंगल कार्यालयावरील पालिकेच्या कारवाईचा हातोडा खरोखरच चालणार की वरून दबाव आल्यानंतर कारवाईला ब्रेक लागणार याकडे धर्माबादवासीयांचे लक्ष लागले आहे.

बांधकामधारकांच्या तोंडचे पाणी पळणार
शहरातील बाळापूर रस्त्यावर दोन, गंगासीटी येथे एक, हिंदू स्मशानभूमीचा परिसर एक असे एकूण चार मंगल कार्यालयाचे बांधकाम विना परवानगी व आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आढळून आले असल्याची नोंद पालिकेकडे आहे. या विनापरवाना मंगल कार्यालयावर पालिकेचा हातोडा चालणार असल्याने बांधकामधारकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

SCROLL FOR NEXT