real estate fraud bogus price hike crime in nanded  esakal
नांदेड

Nanded Crime : प्लॉट, फ्लॅटच्या किमतीत मोठी फसवणूक!

बोगस दरवाढीमुळे मंदी; जागा दराबाबत वाढतोय संशय, ग्राहकांनी राहावे दक्ष

अभय कुळकजाईकर

नांदेड : नांदेड शहरामध्ये किंवा शहरालगत असलेल्या आजूबाजूच्या गावांमध्ये तुम्ही जर एखादा प्लॉट, फ्लॅट, रो हाऊस किंवा बंगला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी घ्‍या आणि सावध रहा.

कारण तुमची किंमतीच्या बाबतीत मोठी फसवणुक होऊ शकते. गेल्या सहा - आठ महिन्यापासून काही जणांनी संगनमत करून अचानक बोगस दरवाढ केली असल्यामुळे फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. बोगस दरवाढीमुळे मंदीचेही वातावरण असून दराबाबत ग्राहकांमध्येही संशय वाढत चालला आहे.

कोरोना संसर्गाच्या काळामध्ये दोन - तीन वर्षे प्लॉट, फ्लॅट, बंगले, रो हाऊस आदी खरेदी - विक्रीचे काम जवळपास ठप्पच झाले होते. त्यानंतर गेल्या एक ते दीड वर्षात खरेदी - विक्रीची कामे थोडी फार सुरळीत झाली.

दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुंठेवारीचा प्रश्न निर्माण झाला तसेच दुसरीकडे काही बोगस खरेदी खतेही झाल्याचे उघड झाले त्यावरून पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होण्याच्या घटनाही घडल्या. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता दुसरीकडे पुन्हा खरेदी विक्रीचे प्रमाण मंदावले.

आता खरेदी विक्री बऱ्यापैकी सुरू होईल असे वाटत असतानाच अचानक काही एजंट आणि काही बांधकाम व्यावसायिक यांनी दरवाढ केली. मात्र, ही दरवाढ बोगस असल्याचे काही जणांचे म्हणणे असून फसवणुक होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. काही ठिकाणी त्यामुळे तक्रारीही आल्या आहेत.

या सगळ्या घटना पाहता नांदेड वाघाळा महापालिका हद्दीत त्याचबरोबर महापालिका हद्दीला लागूनच असलेल्या वाडी, विष्णुपुरी किंवा इतर गावांतील जागा खरेदी करताना तहसील कार्यालयात महसूल तसेच नगररचना विभागाकडून मालकी हक्क व अकृषिक परवानगी याबाबतची खातरजमा करून घ्यावी.

पूर्ण शहानिशा झाल्‍यानंतर खरेदीचा व्यवहार करावा म्हणजे फसवणुक होणार नाही. त्याचबरोबर जागेचे दरही तपासून घ्यावेत. शासनाच्या दरामध्ये आणि प्रत्यक्षात असलेल्या दरामध्ये मोठी तफावत असून जवळपास चार पाच पटीने वाढल्याने त्याचा फटका खरेदी करणाऱ्या ग्राहकाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घाई गडबड झाली तर फसवणुक होण्याची शक्यता जास्त आहे.

खरेदी करताना ही घ्या काळजी...

  • सात बारा, गुंठेवारी, कलेक्टर येणे आदींची पडताळणी करावी.

  • मंजूर ले आऊट, बांधकामाची परवानगी याबाबत माहिती घ्यावी.

  • अकृषिक, भोगवटा प्रमाणपत्र तपासून घ्यावे.

  • मंजूर नकाशानुसार बांधकाम असल्याची खात्री करावी.

  • बिल्टअप आणि सुपर बिल्टअपची माहिती घ्यावी.

  • बॅंकेचा किंवा इतर कर्जाच्या बोजाची माहिती पहावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT